Cannes 2017 : रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय-बच्चनची सिंड्रेला अवतारात एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 14:54 IST2017-05-20T09:21:37+5:302017-05-20T14:54:12+5:30

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१७ मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा अंदाज कसा असेल याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. जेव्हा तिने ...

Cannes 2017: Aishwarya Rai-Bachchan's entry in the Cinderella avatar on the red carpet! | Cannes 2017 : रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय-बच्चनची सिंड्रेला अवतारात एंट्री!

Cannes 2017 : रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय-बच्चनची सिंड्रेला अवतारात एंट्री!

न्स फिल्म फेस्टिव्हल २०१७ मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा अंदाज कसा असेल याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. जेव्हा तिने शुक्रवारी कान्सच्या रेड कार्पेटवर सिंड्रेला अवतारात एंट्री केली तेव्हा तिचे सौंदर्य बघण्यासारखे होते. दीपिका पादुकोणच्या एंट्रीनंतर सगळ्यांनाच ऐश्वर्याविषयी उत्सुकता लागली होती. अखेर तिने आपला जलवा दाखवून कान्सच्या रेड कार्पेटवर चार चॉँद लावले. 







माझी विश्वसुंदरी असलेली ऐश्वर्या रेड कार्पेटवर एखाद्या प्रिन्सेसपेक्षा कमी दिसत नव्हती. ऐश्वर्याने मायकल सिन्को याने डिझाइन केलेला पाउडर ब्लू रंगाचा बॉल गाउन ड्रेस घातला होता. यावेळी ऐश्वर्याने तिच्या प्रिसेन्स लुकमध्ये कुठल्याही प्रकारची ज्वेलरी घातली नव्हती. त्यामुळे तिचे सौंदर्य आणखीच खुलले होते. ऐश्वर्याची रेड कार्पेटवरील एंट्री एवढी मनमोहक राहिली की, सगळेच तिला बघण्यासाठी आतुर झाले होते. 







यावेळी ऐश्वर्याने कॉस्मेटिक ब्रॅण्ड लॉरियल पेरिस यास प्रमोट केले. या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचे हे १६ वे वर्ष आहे. २००२ मध्ये ती पहिल्यांदा ‘देवदास’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली आणि शाहरूख खान यांच्याबरोबर पोहोचली होती. तेव्हापासून ती प्रत्येक वर्षी कान्समध्ये सहभागी होत आहे. शिवाय प्रत्येकवर्षी तिचा ड्रेस अन् रेड कार्पेटवरील एंट्रीवरून तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. 







दरम्यान, ऐश्वर्या यावर्षी आपली पाच वर्षीय मुलगी आराध्यासोबत कान्समध्ये पोहोचली होती. गुरुवारी दुपारच्या दरम्यान ऐश्वर्याला आराध्यासोबत बघण्यात आले होते. त्याचबरोबर या माय-लेकी मार्टिनेज हॉटेलच्या बाहेर येताना स्पॉट झाल्या होत्या. यावेळी आराध्याने छायाचित्रकारांना पोजही दिली होती. 

Web Title: Cannes 2017: Aishwarya Rai-Bachchan's entry in the Cinderella avatar on the red carpet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.