​करिनाने का टाळला फवादचा उल्लेख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 13:51 IST2016-10-26T13:51:06+5:302016-10-26T13:51:06+5:30

करिना कपूर सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. पण तरिही बॉलिवूडमध्ये ती सक्रीय आहे. वेगवेगळ्या इव्हेंटला हजेरी लावणे, कमर्शिअल शूट असे ...

Caina refrained mention! | ​करिनाने का टाळला फवादचा उल्लेख!

​करिनाने का टाळला फवादचा उल्लेख!

िना कपूर सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. पण तरिही बॉलिवूडमध्ये ती सक्रीय आहे. वेगवेगळ्या इव्हेंटला हजेरी लावणे, कमर्शिअल शूट असे काय-काय ती करते आहे. अलीकडे करिनाने ‘मामि फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’या बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली. निश्चितपणे पत्रकारांनी करिनाला घेरले. मग काय, करिनावर एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. करणचा हा चित्रपट कसा वाटला? असा प्रश्न एका पत्रकाराने करिनाला केला. यावर करिनाने सगळ्याच कलाकारांचे भरभरून कौतुक केली. माझ्यामते, सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर काम केलेय, असे सांगत करिनाने चित्रपटातील जवळपास सगळ्या कलाकारांची नावे घेतली. पण एका कलाकाराकडे मात्र तिने साफ दुर्लक्ष केले. हा कलाकार म्हणजे फवाद खान. होय, पाकिस्तानी कलाकार फवाद खान याच्या नावाचा उल्लेख तिने टाळला. पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये बंदी लादण्याच्या मुद्यावरही करिनाला प्रश्न विचारण्यात आला. पण करिनाने या प्रश्नालाही बगल दिली. ‘मामि’ या मुद्यावर बोलण्याची जागा नाही. अशा वादग्रस्त विषयावर याठिकाणी बोलणे योग्य नाही. इथे कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांबद्दल चर्चा होते. हीच चर्चा व्हावी, असे करिनाने स्पष्ट केले. एकंदर काय, तर करिनाने फवादला अक्षरश: टाळले. आता यामागचे कारण तिलाच ठाऊक!!
पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असल्यामुळे करणचा ‘ऐ दिल है मुश्किल’ अडचणीत सापडला होता. पण अखेर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर  मनसेचा विरोध मावळला आणि ‘ऐ दिल...’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात काम देणार नाही, चित्रपट सुरू होण्यापूर्वी भारतीय जवानांंना श्रद्धांजली आणि आर्मी वेल्फेअर फंडात ५ कोटी रुपये जमा करण्याच्या तडजोडीवर ‘ऐ दिल’च्या मार्गातील ‘मुश्किल’ दूर झाली.  

Web Title: Caina refrained mention!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.