​मॅगझिनच्या कव्हरपेजवर ‘कैफ सिस्टर’चा जलवा! तुम्हीही पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 12:26 IST2018-04-01T06:56:23+5:302018-04-01T12:26:23+5:30

कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ लवकरचं बॉलिवूड डेब्यू करते आहे. त्यापूर्वी लहान बहिणीला प्रमोट करण्यात कॅटरिनाने कुठलीही कसर सोडली ...

Caf Sister's cover on magazine cover page! You also see !! | ​मॅगझिनच्या कव्हरपेजवर ‘कैफ सिस्टर’चा जलवा! तुम्हीही पाहाच!!

​मॅगझिनच्या कव्हरपेजवर ‘कैफ सिस्टर’चा जलवा! तुम्हीही पाहाच!!

टरिना कैफची बहीण इसाबेल कैफ लवकरचं बॉलिवूड डेब्यू करते आहे. त्यापूर्वी लहान बहिणीला प्रमोट करण्यात कॅटरिनाने कुठलीही कसर सोडली नाही.  बॉलिवूडच्या मोठ्या इव्हेंटमध्ये तिला सोबत घेऊन जाण्यापासून तर सलमानजवळ तिची शिफारस करण्यापर्यंत सगळे काही कॅटने केले. लहान बहीणीचे करिअर मार्गी लागावे, इतकीच काय ती कॅटची अपेक्षा होती. या अपेक्षेपोटी कॅटने आता आणखी एक पाऊल पुढे टाकत, एका मॅगझिनसाठी बहीणीसोबत पोझ दिली आहे. होय, ‘ब्राईड्स टुडे’ या मॅगझिनच्या कव्हरपेजवर लवकरच कॅटरिना कैफ व इसाबेल कैफ या दोघी बहिणी एकत्र झळकणार आहे. कॅटरिना व इसाबेल दोघींनीही आपल्या इन्स्टा अकाऊंटवर हा कव्हर पेज अपीअरन्स शेअर केला आहे. 



दीदी...माझी ८ वी बहीण नुपूर मेहताने स्टाईल केलेले लूक...असे कॅटने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. ‘ब्राईड्स टुडे’च्या एप्रिलच्या अंकात कॅट व इसाबेलच्या ब्राईडल अदा दिसणार आहेत. यात कॅट व इसाबेल दोघींनीही डिझाईनर तरूण तहिलियानीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला आहे.



सीक्वेंस ब्लाऊजसोबत हाय वेस्ट फ्लोरल गोल्डन स्कर्टमध्ये कैफ सिस्टर्सचा अंदाज शानदार आहे. या ड्रेससोबत न्यूड मेकअप आणि रॉयल ज्वेलरीने दोघींच्या सौदर्यांत भर घातली आहे.  चाहत्यांनी या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक्स दिले आहेत. अर्थात काहींनी इसाबेलवर कॅटरिनाची कॉपी केल्याचा आरोप केला आहे.

ALSO READ : ​कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ बनणार लॅटिन डान्सर, साईन केला पहिला चित्रपट!

कॅटरिना कैफची बहीण इसाबेलनेआपला पहिला वहिला बॉलिवूड चित्रपट साईन केला आहे. ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटातून इसाबेल बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.  या चित्रपटात तीसूरज पांचोलीसोबत रोमान्स करताना दिसेल. या चित्रपटात इसाबेल  बॉल रूम व लॅटिन डान्सरच्या भूमिकेत आहे तर सूरज एका स्ट्रीट डान्सरच्या रूपात. कोरिओग्राफी आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाचा सहाय्यक स्टेनली डिकोस्टा हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. अर्थात यात रेमोचाही सहभाग आहे. होय, या चित्रपटाची कथा रेमोने लिहिली आहे. पुढील महिन्यात ‘टाईम टू डान्स’चे शूटींग सुरू होईल.  

Web Title: Caf Sister's cover on magazine cover page! You also see !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.