​सलमान-ऐशच्या जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 15:53 IST2016-06-05T10:23:41+5:302016-06-05T15:53:41+5:30

माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या आणि सलमान खान यांचे नाते बॉलिवूडसह दोघांच्या चाहत्यांना पूर्ण जाणीव आहे. बॉलिवूडमध्ये त्यांचा ब्रेकअप सर्वात मोठा मानला ...

Burn the old memories of Salman-Ash | ​सलमान-ऐशच्या जुन्या आठवणींना उजाळा

​सलमान-ऐशच्या जुन्या आठवणींना उजाळा

जी विश्वसुंदरी ऐश्वर्या आणि सलमान खान यांचे नाते बॉलिवूडसह दोघांच्या चाहत्यांना पूर्ण जाणीव आहे. बॉलिवूडमध्ये त्यांचा ब्रेकअप सर्वात मोठा मानला जातो. दोघेही आज जरी एकमेकांसमोर येण्याचे टाळत असले तरी सलमानच्या मनात जुन्या आठवणी कुठेतरी आहेतच. कारण अशी शंका निर्माण होणाºया घटना अनेकदा समोर येत असतात. आता सुलतानच्या निमित्ताने ही शंका पुन्हा नव्याने डोकं वर काढत आहे.


 सलमान सध्या बुडापेस्टमध्ये ‘सुलतान’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्यानिमित्ताने बुडापेस्टमधील शेचेन्यी ब्रिजवर सलमान आला होता. याच ब्रिजवर हम दिल दे चुके सनम चित्रपटातील शेवटच्या सीनचं शूटिंग झालं होतं. त्यामध्ये ऐश्वर्या धावत जाऊन अजय देवगनच्या खांद्यात विसावते. मात्र ‘सुलतान’च्या निमित्ताने याच शेचेन्यी ब्रिजवरील एक फोटो पोस्ट केला आहे.

Web Title: Burn the old memories of Salman-Ash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.