भाईजानच्या लग्नाची तयारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 16:27 IST2016-05-18T10:57:29+5:302016-05-18T16:27:29+5:30

दबंग सलमान खाननं हेअर ट्रान्सप्लान्ट करतो ही गोष्ट जगजाहीर आहे. मात्र आता पुन्हा एकदा सलमान खाननं हेअर ट्रान्सप्लान्ट केलंय. ...

Brother's wedding preparations! | भाईजानच्या लग्नाची तयारी !

भाईजानच्या लग्नाची तयारी !

dir="ltr">


दबंग सलमान खाननं हेअर ट्रान्सप्लान्ट करतो ही गोष्ट जगजाहीर आहे. मात्र आता पुन्हा एकदा सलमान खाननं हेअर ट्रान्सप्लान्ट केलंय. ल्युलिया व्हॉन्चुअरसोबत सलमानच्या लग्नाची ही पूर्वतयारी असल्याचं बोललं जातंय. या वर्षाच्या अखेरपर्यंत सलमान लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या कानावर पडतायत. याच पार्श्वभूमीवर पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमाननं पुन्हा एकदा हेअर ट्रान्सप्लान्ट करुन घेतलं आहे. यावेळी सलमानसह खुद्द त्याची गर्लफ्रेंड ल्युलिया आणि आई सलमा उपस्थित होते. यावेळी सलमानच्या हेअर ट्रान्सप्लान्टसाठी खास दुबईवरुन डॉक्टर आले होते. या डॉक्टरांनी सलमानवर हे ट्रान्सप्लान्ट केलंय. आता या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सलमानला घरातच एसीमध्ये राहावं लागणार आहे. कारण घामामुळं ही ट्रीटमेंट वाया जाण्याची भीती आहे. याआधी 2003, 2006 मध्ये सलमाननं हेअर ट्रान्स प्लान्ट केलंय.
 


 

Web Title: Brother's wedding preparations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.