बॉयफ्रेंडने सोनम कपूरला म्हटले ‘प्रिन्सेस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 22:08 IST2017-07-04T16:38:04+5:302017-07-04T22:08:43+5:30

सोनमचा बॉयफ्रेंड तर तिच्या या अंदाजावर चांगलाच फिदा झाला. सोनमचा एक फोटो शेअर करीत चक्क तिला ‘प्रिन्सेस’ म्हणून त्याने संबोधले.

Boyfriend calls Sonam Kapoor "princes" | बॉयफ्रेंडने सोनम कपूरला म्हटले ‘प्रिन्सेस’

बॉयफ्रेंडने सोनम कपूरला म्हटले ‘प्रिन्सेस’

लिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर तिच्या स्टाइल स्टेटमेंटकरिता प्रसिद्ध आहे. केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनात सोनम लेटेस्ट स्टाइल ट्रेंडला प्रमोट करताना बघावयास मिळते. गेल्या सोमवारी सोनम पेरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. शोमध्ये केवळ तिचा सहभाग नव्हता तर ती या शोची ‘शो-स्टॉपर’ होती. इंटरनॅशनल डिझायनर राल्फ अ‍ॅण्ड रूसोच्या आॅटम विंटर कलेक्शनची शो-स्टॉपर बनलेल्या सोनमने रॅम्प वॉक करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. तिचे सौंदर्य असे काही झळकत होते की, उपस्थितांमधील प्रत्येकजण तिच्या प्रेमात पडला नसेल तरच नवल. सोनमचा बॉयफ्रेंड तर तिच्या या अंदाजावर चांगलाच फिदा झाला. सोनमचा एक फोटो शेअर करीत चक्क तिला ‘प्रिन्सेस’ म्हणून त्याने संबोधले.  

रॅम्प वॉक करतानाचा एक फोटो शेअर करीत बॉयफ्रेंड आनंद आहूजा याने ‘रिअल लाइफ प्रिन्सेस’ असे कॅप्शन दिले. वास्तविक सोनम आणि आनंद यांनी त्यांच्यातील नाते कधीच लपवून ठेवले नाही. बºयाचदा हे दोघे पार्टी तसेच इव्हेंटमध्ये एकत्र झळकले आहेत. काही दिवसांपूर्वीच हे दोघे लंडन येथे सुट्या एन्जॉय करताना बघावयास मिळाले होते. सोनम स्वत:च तिच्या पर्सनल लाइफविषयी पझेसिव्ह असल्याने तिला सर्वसामान्य मुलीप्रमाणे आयुष्य जगायला आवडते. आपल्या आयुष्यात कुठलीच गोष्ट सीक्रेट नसावी, असा विचार करून ती नेहमीच तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करीत असते. 
 

दरम्यान, या फॅशन विकमध्ये सोनमने छाप सोडली असून, तिच्या सौंदर्याचे सगळ्यांनीच कौतुक केले. सोनमची रॅम्पवरील एंट्री चर्चेचा विषय ठरल्याने, सोनम इंटरनॅशनल मीडियामध्ये चर्चेत आहे. यापूर्वीदेखील सोनमने अनेक फॅशन शोमध्ये सहभाग घेतला आहे. प्रत्येकवेळी तिने आपल्या हटके स्टाइलने अनेकांना घायाळ केले आहे. ‘नीरजा’ या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड जिंकणारी सोनम लवकरच ‘पॅडमॅन’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. 

Web Title: Boyfriend calls Sonam Kapoor "princes"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.