‘त्या’ न्यूड सीनमुळे ट्रोल होतेय राधिका आपटे,  ट्वीटरवर ट्रेंड होतंय #BoyCottRadhikaApte

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 01:47 PM2021-08-13T13:47:51+5:302021-08-13T13:48:46+5:30

अचानक का संतापले नेटकरी? का ट्रोल होतेय राधिका आपटे? पाहूया काय आहे नेमकं प्रकरण

#BoycottRadhikaApte trends on Twitter after Radhika Apter old nude photos viral | ‘त्या’ न्यूड सीनमुळे ट्रोल होतेय राधिका आपटे,  ट्वीटरवर ट्रेंड होतंय #BoyCottRadhikaApte

‘त्या’ न्यूड सीनमुळे ट्रोल होतेय राधिका आपटे,  ट्वीटरवर ट्रेंड होतंय #BoyCottRadhikaApte

googlenewsNext
ठळक मुद्दे न्यूड सीन्स लीक झाल्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. मध्यंतरी  तिने ‘न्यूड व्हिडीओ लीक’वर प्रतिक्रिया दिली होती.

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) अचानक  ट्वीटरवर ट्रोल होतेय. सोशल मीडियावर #BoyCottRadhikaApte हा हॅशटॅगही ट्रेंड होतोय. ते सुद्धा एका विचित्र कारणामुळे. होय, जुन्या न्यूड सीनमुळे आणि राज कुंद्राच्या ‘कारमाम्या’मुळे राधिकाला युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. लोकांनी तिच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.  ‘पार्च्ड’ या सिनेमातील तिच्या न्यूड सीन्सचे काही फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत आणि याचा संबंध लोकांनी थेट राज कुंद्रा प्रकरणाशी जोडत तिला ट्रोल करण्याचा सपाटा लावला आहे.
#BoyCottRadhikaApte या हॅशटॅग अंतर्गत आत्तापर्यंत 25 हजारांपेक्षा अधिक  ट्वीट केले गेले आहेत.  (#BoycottRadhikaApte trends on Twitter after her nude photos)

राधिका आपटेने 2016 मध्ये लीना यादव दिग्दर्शित ‘पार्च्ड’ या चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये राधिका अभिनेता आदिल हुसैनसोबत झळकली होती. या चित्रपटात राधिकाने आदिलसोबत न्यूड सीन दिला होता. आता या जुन्या न्यूड सीनवरून राधिकाला ट्रोल केलं जात आहे.

बॉलिवूड चित्रपटांमुळे आपल्या देशामध्ये अश्लीलता पसरत आहे, म्हणत ट्रोलर्सनी राधिकाला लक्ष्य केलं आहे.  राधिकाने भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोपही तिच्यावर लावण्यात आला आहे.

काहींनी तर राधिकाचा संबंध थेट राज कुंद्रा प्रकरणाशी जोडत तिला ट्रोल केलं आहे. राधिका व तिच्यासारखे बॉलिवूडचे अनेक स्टार्स राज कुंद्रा प्रकरणावर गप्पगार का? याचा राग लोकांच्या मनात आहेत.  

राधिका आपटेबॉलिवूडची बोल्ड, बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते हिंदी, मराठी शिवाय साऊथच्या अनेक सिनेमांत दमदार भूमिका साकारणा-या राधिकाने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. पण सोबत अनेक कॉन्ट्रोव्हसीर्मुळेही ती चर्चेत राहिली. न्यूड सीन्स लीक झाल्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. मध्यंतरी  तिने ‘न्यूड व्हिडीओ लीक’वर प्रतिक्रिया दिली होती.
ग्रेझिया या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली होती.  ‘Clean Shaven’ची माझी एक न्यूड क्लिप लीक झाल्यानंतर मला प्रचंड ट्रोल करण्यात आले. याचा मला जबर धक्का बसला होता. मी चार दिवस घरातून बाहेर पडले नव्हते़.  मी खूप घाबरले होते. माझा ड्रायव्हर, घरातील मोलकरीण, दुकानात जायला देखील मला भीती वाटत होती. ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील, हा विचार मनात येत होता. अगदी फोनची रिंग वाजली तरी मी घाबरायचे. कोण काय विचार करेल? कोण माझ्याकडे कुठल्या दृष्टीने पाहत असेल या विचारामुळे मी जणू नैराश्येत गेले होते. जवळपास एक आठवडा मी स्वत;ला घरात बंद करुन घेतले होते. पण अशा परिस्थितीत मला माझ्या कुटुंबीयांनी सावरले. मी एक अभिनेत्री आहे. समाजातील व्यक्तिरेखा साकारणे हेच माझे काम आहे, हे आईने मला समजावून सांगितले. त्यामुळे मी त्यातून बाहेर पडू शकले, असे ती म्हणाली होती.

Web Title: #BoycottRadhikaApte trends on Twitter after Radhika Apter old nude photos viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.