Box Office..Big Clash : श्रीदेवी आणि श्रद्धा कपूरमध्ये टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 22:05 IST2017-03-16T16:35:29+5:302017-03-16T22:05:29+5:30

येत्या १४ जुलै रोजी बॉक्स आॅफिसवर दोन बड्या बॅनरच्या सिनेमांचा घमासान बघावयास मिळणार आहे. होय, आम्ही अभिनेत्री श्रीदेवी आणि ...

Box Office..Big Clash: Shridevi and Shraddha Kapoor clash! | Box Office..Big Clash : श्रीदेवी आणि श्रद्धा कपूरमध्ये टक्कर!

Box Office..Big Clash : श्रीदेवी आणि श्रद्धा कपूरमध्ये टक्कर!

त्या १४ जुलै रोजी बॉक्स आॅफिसवर दोन बड्या बॅनरच्या सिनेमांचा घमासान बघावयास मिळणार आहे. होय, आम्ही अभिनेत्री श्रीदेवी आणि श्रद्धा कपूर यांच्या सिनेमांविषयी बोलत आहोत. श्रीदेवी ‘इंग्लिश-विंग्लिश’नंतर ‘मॉम’ या सिनेमातून पुन्हा मोठा पडदा गाजविण्यात येत असून, दुसरीकडे ‘रॉक आॅन-२’ची अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘हसीना’ या बायोपिकमधून प्रेक्षकांची मने जिंकायला येत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलिज होणार असल्याने पडद्यावर बिग क्लॅश निर्माण होणार आहे. 

दोघींच्या या सिनेमांमध्ये श्रीदेवी आणि श्रद्धा अ‍ॅण्टी अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रीदेवीविषयी बोलायचे झाल्यास या सिनेमातून ती तिच्या करिअरची ५० वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे तिचा पती बोनी कपूर पत्नीच्या करिअरला गोल्डन ज्युबिलीप्रमाणे सेलिब्रेट करू इच्छितो. या सिनेमात श्रीदेवी कठोर आणि स्वार्थी महिलेच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. तिची ही भूमिका ‘मदर इंडिया’ या सिनेमातील भूमिकेशी पूर्णत: विपरीत आहे. सिनेमात ती सावत्र मुलीचा शोध घेताना बघावयास मिळणार आहे. सिनेमात श्रीदेवी व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

आता श्रद्धा कपूर हिच्या ‘हसीना’ या सिनेमाविषयी सांगायचे झाल्यास, हा सिनेमा एक बायोपिक आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्या जीवनावर आधारित आहे. दीड वर्षांपूर्वी हसीनाचे मुंबई येथे निधन झाले होते. हसीनाला आजही मुंबईच्या नागपाडा या परिसराची ‘गॉडमदर’ म्हणून ओळखले जाते. तिच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. दाऊदच्या डी कंपनीचा सर्व कारभार तीच सांभाळत असल्याचे समोर आले होते. आता श्रद्धा या बायोपिकमधून हसीना साकारणार असल्याने तिला या सिनेमातून बºयाचशा अपेक्षा आहेत. 

एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, दोन्ही सिनेमे दमदार असून, त्यांच्यात श्रद्धा आणि श्रीदेवी दमदार भूमिकेत बघावयास मिळणार आहे. त्यामुळे बॉक्स आॅफिसवर या सिनेमांमध्ये जबरदस्त क्लॅश होण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, प्रेक्षक दोघींपैकी कोणाची भूमिका पसंत करणार हे बघणे मजेशीर ठरेल. 

Web Title: Box Office..Big Clash: Shridevi and Shraddha Kapoor clash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.