BOX OFFICE : ‘टायगर जिंदा है’ने मारली बाजी; सलमान खान बनला बॉक्स आॅफिसचा ‘सुलतान’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 16:05 IST2017-12-26T10:29:29+5:302017-12-26T16:05:29+5:30
सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर धूम करीत आहे. ...

BOX OFFICE : ‘टायगर जिंदा है’ने मारली बाजी; सलमान खान बनला बॉक्स आॅफिसचा ‘सुलतान’!
स परस्टार सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर धूम करीत आहे. त्याचबरोबर सलमानने पुन्हा एकदा दाखवून दिले की, तोच बॉक्स आॅफिसचा ‘सुलतान’ आहे. कारण सलमानच्या करिअरमधील तब्बल बारा चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर शंभर कोटी रूपयांचा आकडा पार केला आहे. तर त्यातील ‘सुलतान’ (३२० कोटी) आणि ‘बजरंगी भाईजान’ (३०० कोटी) हे दोन असे चित्रपट आहेत, ज्यांनी ३०० कोटींपर्यंत मजल मारली आहे. त्याचबरोबर सलमान एकमेव असा अभिनेता बनला आहे, ज्याच्या सर्वाधिक चित्रपटांनी शंभर कोटी रूपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. दरम्यान, सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने चारच दिवसांत १५१.४७ कोटी रूपयांची कमाई केली आहे.
दरम्यान, सलमान खानच्या चित्रपटांच्या सुरुवातीच्या तीन दिवसांविषयी सांगायचे झाल्यास ‘टायगर जिंदा है’ अगोदरचे दोन असे चित्रपट आहेत, ज्यांनी वीकेंडमध्येच शंभर कोटी रूपयांचा आकडा पार केला आहे. ज्यामध्ये ‘बजरंगी भाईजान’ (१०२.६० कोटी) आणि ‘सुलतान’ (१०५.५३ कोटी) या चित्रपटांचा समावेश आहे, तर ‘ट्यूबलाइट’ने वीकेण्डमध्ये ६२.७७ कोटी रूपयांची कमाई केली होती. ‘टायगर जिंदा है’बद्दल सांगायचे झाल्यास या चित्रपटाने तीन दिवसांत ११४.९३ कोटी रूपयांची कमाई केली आहे.
सलमानच्या शंभर कोटी क्लबमधील चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास, ‘दबंग, बॉडीगार्ड, रेडी, दबंग-२, एक था टायगर, किक, जय हो, प्रेम रतन धन पायो, बजरंगी भाईजान, सुलतान, ट्यूबलाइट आणि टायगर जिंदा हंै’ या चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान, सलमानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट यावर्षीचा सर्वांत मोठी ओपनिंग करणाºया टॉप थ्री चित्रपटांमध्ये दुसºया स्थानावर आहे. या अगोदर ‘बाहुबली-२’ने बाजी मारीत पहिल्याच दिवशी ४१ कोटी रूपयांचा गल्ला जमविला होता. दुसºया स्थानावर ‘टायगर जिंदा है’ने ३३.७५ कोटी रूपयांपर्यंत बाजी मारली, तर तिसºयास्थानी असलेल्या ‘गोलमाल अगेन-३ने ३०.१४ कोटी रूपयांची ओपनिंग केली होती. आता ‘टायगर जिंदा है’ किती कोटींपर्यंत बाजी मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.