Box office : ‘या’ चित्रपटांनी केली बॉक्सआॅफिसवर धमाकेदार सुरुवात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 16:25 IST2018-04-02T10:55:43+5:302018-04-02T16:25:43+5:30

-रवींद्र मोरे  २०१८ ची सुरुवात चित्रपटांसाठी खूपच धमाकेदार राहिली. यावर्षी आतापर्यंत सुमारे १५ बॉलिवूड चित्रपट रिलीज झालेत, ज्यापैकी एका ...

Box office: 'These' Boxes started bang on Box Office! | Box office : ‘या’ चित्रपटांनी केली बॉक्सआॅफिसवर धमाकेदार सुरुवात !

Box office : ‘या’ चित्रपटांनी केली बॉक्सआॅफिसवर धमाकेदार सुरुवात !

ong>-रवींद्र मोरे 
२०१८ ची सुरुवात चित्रपटांसाठी खूपच धमाकेदार राहिली. यावर्षी आतापर्यंत सुमारे १५ बॉलिवूड चित्रपट रिलीज झालेत, ज्यापैकी एका चित्रपटाने सुमारे ४०० करोड तर दुसऱ्या एका चित्रपटाने १०० करोड कमविले. अलिकडे रिलीज झालेला टायगर श्रॉफच्या 'बागी 2'ने देखील दमदार ओपनिंग केली आहे. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यांनी धमाकेदार सुरुवात करत बक्कळ कमाई केली आहे.   

Related image

* पद्मावत 
संजय लीला भंसाली दिग्दर्शित 'पद्मावत' बऱ्याच वादविवादानंतर २४ जानेवारी रोजी रिलीज झाला होता. दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शाहिद कपूर स्टारर 'पद्मावत' हा चित्रपट २०१८ चा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सुमारे ४०० करोड एवढी शानदार कमाई केली आहे.    

Image result for sonu ke tiu ki swity

* सोनू के टीटू की स्वीटी 
लव रंजन दिग्दर्शित रोमॅँटिक कॉमेडी चित्रपट 'सोनू के टीटू की स्वीटी' ने सर्वांना चकित करत चवथ्या आठवड्यात १०० करोड क्लबमध्ये एंट्री मिळविली. विशेष म्हणजे या चित्रपटात कोणताच सुपरस्टार नाही तरीही दर्शकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्यात यश मिळविले. या चित्रपटाच्या कथेशी दर्शक एवढे कनेक्ट झाले की, या चित्रपटासमोर अक्षय कुमार आणि अनुष्का शर्माचा चित्रपटदेखील गारद झाला.  

Related image

* पॅड मॅन
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे स्टारर चित्रपट 'पॅड मॅन' दर्शकांना खूपच आवडला. हा चित्रपट ९ जानेवारीला रिलीज झाला होता. विशेष म्हणजे वेगळ्या धाटणीच्या या चित्रपटाबाबत दर्शकांना खूपच उत्सुकता होती. हिच उत्सुकता बॉक्स आॅफिसवर दिसून आली आणि पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने धमाकेदार सुरुवात करत ६२ करोड ८७ लाख एवढी कमाई केली होती. आतापर्यंत या चित्रपटाने सुमारे ८० करोडपर्यंत कमाई केली आहे.   

Related image

* रेड 
अजय देवगन आणि इलियाना डिक्रूजच्या 'रेड' चित्रपटाने दमदार प्रदर्शन करत वर्ल्डवाइड बॉक्स आॅफिसवर सुमारे ९० करोड रुपयांची कमाई केली आहे. काही दिवसांनी हा आकडा १०० करोडपर्यंत पोहचू शकतो. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड' हा चित्रपट दमदार स्क्रीप्ट, स्टारकास्ट आणि डायलॉग्सच्या कारणाने खूपच पसंत केला जात आहे. 

Image result for hichki

* हिचकी 
राणी मुखर्जी स्टारर 'हिचकी' या चित्रपटानेही दमदार सुरुवात करत सर्वांना चकित केले आहे. सुरुवातीलाच या चित्रपटाने सुमारे ३ करोडची कमाई केली होती गेल्या शनीवारी सुमारे ५.६ करोडची कमाई केली होती. असे सांगण्यात येत आहे की, या चित्रपटाचे विकेंड कलेक्शन सुमारे १५ करोड पर्यंत पोहचले आहे. हा चित्रपट राणीसाठी धमाकेदार कमबॅक ठरत आहे.  

Web Title: Box office: 'These' Boxes started bang on Box Office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.