Box Office : ‘सचिन : अ बिलिअन ड्रीम्स’ची दमदार ओपनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 21:47 IST2017-05-27T16:00:13+5:302017-05-27T21:47:30+5:30
महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘सचिन : अ बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर दमदार ओपनिंग केली आहे.
.jpg)
Box Office : ‘सचिन : अ बिलिअन ड्रीम्स’ची दमदार ओपनिंग
म ान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘सचिन : अ बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. देशभरात शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाला चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, हा चित्रपट चांगली कमाई करेल असे समिक्षकांकडून बोलले जात आहे.
‘डॉक्यूड्रामा’ असलेल्या या चित्रपटाने ओपनिंग डेलाच तब्बल ८.४० कोटींची कमाई केली आहे. हिंदी, मराठी, तामिळ, तेलगू आणि इंग्रजी भाषेत रिलीज करण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सचिनच्या देशभरातील चाहत्यांना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या भाषेत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. गुरुवारी सचिनने मुंबईत सेलिब्रिटींसाठी चित्रपटाचा स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी चित्रपट बघण्यासाठी हजेरी लावली होती. शिवाय यावेळी सर्वांनीच सचिनचे भरभरून कौतुकही केले होते.
सचिनच्या आयुष्यातील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी या चित्रपटातून उलगडत आहेत. ओडिसा, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही हा चित्रपट आधीच करमुक्त करण्यात आला आहे. सचिनच्या जीवनचरित्रातून राज्यातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल या हेतूने हा चित्रपट टॅक्स फ्रीचा निर्णय घेण्यात आला असे आसामचे अर्थमंत्री शशीभूषण बेहेरा यांनी सांगितले.
या चित्रपटात सचिनचा बालपणापासून ते क्रि केटचा देव बनण्यापर्यंतचा जीवन प्रवास उलगडला गेला आहे. गेल्या वर्षी धोनीच्या आयुष्यावर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यामुळे सचिनच्याही चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

}}}} ">Considering it's a docu-drama, #SachinABillionDreams opens IMPRESSIVELY... Fri ₹ 8.40 cr. India biz [Hindi, Marathi, Tamil, Telugu, English]— taran adarsh (@taran_adarsh) May 27, 2017अमिताभ बच्चन यांनी तर ‘सचिन : अ बिलिअन ड्रीम्स हा चित्रपट बघून अभिमान वाटला’ अशा शब्दात सचिनचे कौतुक केले. शिवाय इतरही सेलिब्रिटींना चित्रपटाविषयी समाधान व्यक्त केले होते. सचिनचा हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. क्र ीडाक्षेत्रात सचिनने दिलेल्या योगदानाचा सन्मान आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावरील मनोरंजन कर माफ केला आहे. ब्रिटिश दिग्दर्शक जेम्स एरिस्कयांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
Considering it's a docu-drama, #SachinABillionDreams opens IMPRESSIVELY... Fri ₹ 8.40 cr. India biz [Hindi, Marathi, Tamil, Telugu, English]— taran adarsh (@taran_adarsh) May 27, 2017