Box Office Report : दुसऱ्याच दिवशी ‘बाहुबली-२’ची डबल सेंच्युरी; वाचा सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 17:23 IST2017-04-30T11:50:48+5:302017-04-30T17:23:01+5:30

‘बाहुबली-२’ रिलीज होण्याअगोदर जे अंदाज व्यक्त केले जात होते अगदी तसेच काहीसे घडताना दिसत आहे. कारण पहिल्याच दिवसानंतर ‘बाहुबली-२’ ...

Box Office Report: Second Century of 'Bahubali-2'; Read detailed !! | Box Office Report : दुसऱ्याच दिवशी ‘बाहुबली-२’ची डबल सेंच्युरी; वाचा सविस्तर!!

Box Office Report : दुसऱ्याच दिवशी ‘बाहुबली-२’ची डबल सेंच्युरी; वाचा सविस्तर!!

ाहुबली-२’ रिलीज होण्याअगोदर जे अंदाज व्यक्त केले जात होते अगदी तसेच काहीसे घडताना दिसत आहे. कारण पहिल्याच दिवसानंतर ‘बाहुबली-२’ रेकॉर्डब्रेक कमाई केली असून, दुसºया दिवशीही कमाईचा सिलसिला कायम असल्याचे बघावयास मिळाले. दुसºया दिवसाच्या दुपारपर्यंत चित्रपटाने २२३ कोटी रुपयांची कमाई केल्याचे थक्क करणारे आकडे समोर आले आहेत. 

खरं तर ‘बाहुबली-२’ या चित्रपटाच्या कमाईबाबतचे आकडे जाणून घेणे जाणकारांसाठीदेखील अवघड होत आहे. कारण अंदाजापलीकडे कमाईचे आकडे समोर येत असल्याने हा चित्रपट किती कमाई करणार याविषयी मात्र सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. कारण सुरुवातीच्या काळात जो अंदाज व्यक्त केला जात होता, त्याच्या कितीतरी पटीने कमाईचे आकडे समोर येत आहेत. 

दुसºया दिवशी म्हणजे शनिवारी आलेल्या आकड्यानुसार चित्रपटाने एकूण २२३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी १२१, तर दुसºया दिवशी १०२ कोटी रुपयांचा गल्ला गोळा करून बॉक्स आॅफिसवर एक नवा इतिहास रचला आहे. दुसºया दिवशीच्या कमाईमध्ये हिंदी भाषेतील चित्रपटाने ४२ कोटी, तर तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत ६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 



एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे बजेट सुमारे २५० कोटी रुपये आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाहुबलीच्या पहिल्या भागाने कमाविलेली सर्व रक्कम ‘बाहुबली-२’च्या निर्मितीसाठी लावण्यात आली आहे. चित्रपटाची कथा अन् पहिल्या भागातून निर्माण झालेल्या काही प्रश्नांमुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड आतुरता निर्माण झाली होती.

त्यामुळे आजही या चित्रपटाचे तिकीट उपलब्ध होत नसल्याने प्रेक्षक तिकिटांसाठी रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या ब्लॅकने तिकीट विक्रीचा गोरखधंदाही जोरदार सुरू आहे. दरम्यान, चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता रविवारी हा चित्रपट १५० कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास हा एक मोठा रेकॉर्ड बनणार आहे. 

Web Title: Box Office Report: Second Century of 'Bahubali-2'; Read detailed !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.