BOX OFFICE : महेश बाबूचा ‘हा’ चित्रपट बॉक्स आॅफिसवर करतोय रेकॉर्डब्रेक कमाई, ‘बाहुबली’लाही टाकले मागे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 15:55 IST2018-04-25T10:20:53+5:302018-04-25T15:55:12+5:30
साउथ सुपरस्टार महेश बाबूचा ‘भारत अने नेनु’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करीत आहे. कमाईचा वेग पाहता ‘बाहुबली-२’लाही चित्रपट धोबीपछाड देण्याची शक्यता आहे.

BOX OFFICE : महेश बाबूचा ‘हा’ चित्रपट बॉक्स आॅफिसवर करतोय रेकॉर्डब्रेक कमाई, ‘बाहुबली’लाही टाकले मागे!
स उथ सुपरस्टार महेश बाबूचा ‘भारत अने नेनु’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करीत आहे. चित्रपटाने केवळ दोनच दिवसांमध्ये शंभर कोटी रुपयांची कमाई केली असून, उपलब्ध आकड्यांनुसार चित्रपटाने आतापर्यंत १२५ कोटींचा आकडा पार केला आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला हा चित्रपट वर्ल्डवाइड सुपरहिट ठरला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असल्याने केवळ ४८ तासांतच चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले, तर चार दिवसांमध्येच १२५ कोटींपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता ‘बाहुबली-२’ला कमाईच्या बाबतीत मागे तर टाकणार नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
चित्रपटाच्या कलेक्शनविषयीची माहिती ट्रेड एनालिस्ट रमेश बाळा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली. बाळा यांनी केलेल्या ट्विटनुसार, चित्रपटाच्या आॅफिशियल टीमने दिलेल्या अपडेटनुसार चित्रपटाने १२५ कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचे झाल्यास चित्रपटाची कथा राजकीय पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात महेश बाबूने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली आहे. ड्रामा आणि सस्पेंस असलेला महेश बाबूचा हा चित्रपट ४५ देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शच्या ट्विटनुसार, तेलगू चित्रपट विदेशात ओपनिंग वीकेंडमध्ये धमाकेदार कमाई करीत आहे. त्यामुळे आगामी काळात हा चित्रपट किती कोटींपर्यंत मजल मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तरणच्या ट्विटनुसार, अमेरिकेत चित्रपटाने १३ कोटी ७२ लाख रुपयांची कमाई केली आहे, तर आॅस्ट्रेलियात एक कोटी ७२ लाख रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बॉक्स आॅफिसवर तब्बल २३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

}}}} ">Official Update from Team #BharatAneNenu - The movie has grossed ₹ 125 Crs at the WW BO till now.. pic.twitter.com/F5F0JmmObU— Ramesh Bala (@rameshlaus) April 24, 2018
Official Update from Team #BharatAneNenu - The movie has grossed ₹ 125 Crs at the WW BO till now.. pic.twitter.com/F5F0JmmObU— Ramesh Bala (@rameshlaus) April 24, 2018