‘बाहुबली2’च्या बॉक्सआॅफिस कमाईचे आकडे फसवे? वाचा, केआरके काय म्हणतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2017 15:17 IST2017-05-01T09:41:07+5:302017-05-01T15:17:11+5:30
सध्या बॉक्सआॅफिसवर ‘बाहुबली2’चाच बोलबाला आहे. १०० कोटी, २०० कोटी, ३०० कोटी हे सारे ‘बाहुबली2’च्या कमाईचे आकडे आहेत. मात्र कमाल ...

‘बाहुबली2’च्या बॉक्सआॅफिस कमाईचे आकडे फसवे? वाचा, केआरके काय म्हणतो!
स ्या बॉक्सआॅफिसवर ‘बाहुबली2’चाच बोलबाला आहे. १०० कोटी, २०० कोटी, ३०० कोटी हे सारे ‘बाहुबली2’च्या कमाईचे आकडे आहेत. मात्र कमाल आर. खान उर्फ केआरके याचे मानाल तर हे आकडे खोटे आहेत. ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली आणि सहनिर्माता करण जोहर प्रेक्षकांना मूर्ख बनवत असल्याचा दावा त्याने केला आहे. ‘बाहुबली2’च्या कमाईचे आकडे खरे नाहीत. प्रत्यक्षात बॉक्सआॅफिस कलेक्शनचे सत्य काही वेगळेच आहे आणि प्रेक्षकांना हे जाणण्याचा पूर्ण हक्क आहे, असे केआरकेचे म्हणणे आहे.
खरे तर ‘बाहुबली2’बद्दल केआरके बरेच काही बोलला आहे. ‘बाहुबली2’सारखा अतिशय सुमार आणि वास्तवाशी तिळमात्र संबंध नसलेला चित्रपट लोक पाहतातच कसे, असे केआरकेने म्हटले आहे. आता त्याने ‘बाहुबली2’च्या कमाईचे आकड्यांबद्दल वेगवेगळे दावे केले आहेत. केआरकेचे हे दावे काय आहेत, ते आपण बघूयात...
ALSO READ : दुसऱ्याच दिवशी ‘बाहुबली-२’ची डबल सेंच्युरी; वाचा सविस्तर!!
स्वप्नात होऊ शकते इतके कलेक्शन...
![]()
केआरकेच्या मते, राजमौलीच्या चित्रपटाचे कलेक्शन त्यांच्या चित्रपटासारखेच आहे. जसे त्यांच्या चित्रपटाचे वास्तवाशी काही देणेघेणे नाही, तसेच त्यांचा बॉक्सआॅफिस कलेक्शनचाही वास्तवाशी काहीही संबंध नाही.
साऊथचा बिझनेस इतका अधिक कसा?
![]()
केआरकेच्या दाव्यानुसार, प्रत्येक हिंदी थिएटरमध्ये बाहुबलीचे ६ ते ७ शो सुरु आहेत. असे असताना साऊथचे कलेक्शन हिंदीपेक्षा तिप्पट कसे? ‘बाहुबली2’च्या हिंदी व्हर्जनची तिकिटे दुप्पट भावात विकले जात असताना साऊथमध्ये इतका बिझनेस कसा?
विमल पान मसाला कॅलक्युलेटर
![]()
‘बाहुबली2’ला एक्सपोज करताना केआरकेने अप्रत्यक्षपणे अजय देवगणला लक्ष्य केले आहे. अजयने केलेला अपमान कदाचित केआरके विसरू शकलेला नाही. त्यामुळेच ‘बाहुबली2’चे कलेक्शन अजय देवगण छाप पान मसाला कॅलक्युलेटरने मोजले जात आहे, अशी गुगली त्याने केली आहे.
इतकी कमाई कशी?
![]()
आंध्रात म्हणजे तेलगू ‘बाहुबली2’ १३५० स्क्रीनवर तर हिंदी ‘बाहुबली2’ ४५०० स्क्रीनवर रिलीज झाला आहे. हिंदीचे सगळे शो हाऊसफुल असताना हिंदीची कमाई ३७ कोटी अन् आंध्रची कमाई ४५ कोटी कशी झाली? असा सवाल केआरकेने केला आहे.