‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हे रहस्य ठेवण्यासाठी १५० लोकांकडून लिहून घेतले होते बॉन्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 17:36 IST2017-04-28T12:06:20+5:302017-04-28T17:36:20+5:30

२७० कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेला ‘बाहुबली-२’ हा चित्रपट आज रिलीज करण्यात आला असून, अखेर ‘कटप्पाने बाहुबलीला का ...

Bond was written by 150 people to keep this mystery 'Why did Katappan kill Bahubali?' | ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हे रहस्य ठेवण्यासाठी १५० लोकांकडून लिहून घेतले होते बॉन्ड!

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हे रहस्य ठेवण्यासाठी १५० लोकांकडून लिहून घेतले होते बॉन्ड!

० कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेला ‘बाहुबली-२’ हा चित्रपट आज रिलीज करण्यात आला असून, अखेर ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचे कोडे आता उलगडले आहे. ‘बाहुबली’च्या पहिल्या भागात संबंध प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेल्या या प्रश्नाविषयी कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती. दुसºया भागाच्या रिलीजपर्यंत हे कोणीच सांगू शकले नाही की, अखेर ‘कटप्पाने बाहुबलीला काम मारले?’ मात्र हे रहस्य ठेवण्यासाठी निर्मात्यांनी अनोखी शक्कल लढविली होती. निर्मात्याने हे रहस्य कायम ठेवण्यासाठी १५० लोकांकडून बॉन्ड लिहून घेतल्याची माहिती आता समोर येत आहे. 

चित्रपटाच्या एका क्रू मेंबरने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, कटप्पा बाहुबलीला मारत असतानाचा सीन्स शूट करताना दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी खूपच गुप्तता पाळली होती. अशातही शूटिंगदरम्यान काही माहिती लीक झाली होती. त्यामुळे निर्मात्यांनी हे रहस्य ठेवण्यासाठी तब्बल १५० क्रू मेंबर्सकडून बॉन्ड लिहून घेतला होता. या बॉन्डवर शपथ देण्यात आली होती की, याबाबतची माहिती कोणीही लिक करू नये. 



हा बॉन्ड तेव्हा भरून घेण्यात आला जेव्हा कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नार्थक सीन्सला शूट करायचे होते. या बॉन्डमध्ये स्पष्ट शब्दात लिहिण्यात आले की, या सीन्सशी संबंधित कुठलीही माहिती लीक केल्यास फायनेशियल पेनाल्टी तथा शिक्षा होऊ शकते. कित्येक दिवस तर सेटवर मोबाइल घेऊन येण्यास सक्ती होती, त्याचबरोबर ज्यांच्याकडे मोबाइल आहेत, त्यांना ते आॅफ करून ठेवल्याचे सांगितले जात होते.
 
वास्तविक ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-२’ या चित्रपटांचा संपूर्ण प्राण ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हाच सीन्स आहे. आजही लोक चित्रपटगृहाबाहेर याच प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी गर्दी करीत आहेत. हाच विचार करून निर्माता तथा दिग्दर्शकांनी क्रू मेंबर्सकडून बॉन्ड लिहून घेण्याचा निर्णय घेतला होता. 

Web Title: Bond was written by 150 people to keep this mystery 'Why did Katappan kill Bahubali?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.