बॉम्बेरिया सिनेमाची खडतर वाट,एक दिवसाची कथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यासाठी बराच घाम गाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 20:10 IST2019-01-10T20:08:22+5:302019-01-10T20:10:24+5:30
३ वेगवेगळ्या शेड्युअलमध्ये ८ महिने शुटींग करण्यात आलं. या दरम्यान सिनेमाच्या कंटीन्यूटी अडथळा येणार नाही याची काळजी घेण्यात आली.

बॉम्बेरिया सिनेमाची खडतर वाट,एक दिवसाची कथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यासाठी बराच घाम गाळला
'बॉम्बेरिया' सिनेमातून दिग्दर्शिका पिया सुकन्या हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. या सिनेमात राधिका आपटे, सिद्धांत कपूर आणि शिल्पा शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र बॉम्बेरिया सिनेमा शूट करताना दिग्दर्शिका पिया सुकन्या यांना बरीच कसरत करावी लागली. यासाठी सिनेमाच्या टीमने चांगलाच घाम गाळला. एक दिवसाची कथा दाखवण्यासाठी विविध लोकेशन्सवर शूट करण्यात आलं. ३ वेगवेगळ्या शेड्युअलमध्ये ८ महिने शुटींग करण्यात आलं. या दरम्यान सिनेमाच्या कंटीन्यूटी अडथळा येणार नाही याची काळजी घेण्यात आली. कधी कुणाचं वजन वाढायचं तर कधी कुणाचे केस उभे राहायचे असं पिया सुकन्या यांनी सांगितलं. याच काळात सिनेसृष्टीत २ वेळा झालेल्या संपाचाही फटका बसला.
कधी कधी सिद्धांत कपूरला दुखापत झाल्याने शुटिंगमध्ये अडथळे निर्माण झाले. दुखापतीमुळे सिद्धांत शुटिंगला येऊ शकत नसल्याचे शक्ती कपूर फोन करून सांगायचे असं पियाने म्हटले आहे.. क्लायमेक्स सीन शूट करण्याच्या ५ दिवसआधी शुटिंग लोकेशन गमवावे लागले. त्या सीनमध्ये १४ कलाकार होते. पुन्हा नव्याने त्या १४ कलाकारांच्या तारखा मॅनेज कराव्या लागल्या अन् तो सीन शूट केल्याचे पियाने सांगितले. सिनेमातील अडथळ्यांची १०० उदाहरणं आपल्याकडे सांगण्यासाठी आहेत असंही तिने सांगितलं. मात्र इतक्या मेहनतीचं फळ नक्की मिळतं असा विश्वासही तिला आहे.