गॉसिप्समुळे चर्चेत आले बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 18:26 IST2017-09-08T12:56:52+5:302017-09-08T18:26:52+5:30

अबोली कुलकर्णी  सेलिब्रिटी म्हटल्यावर चर्चा ही आलीच. मग ती चर्चा कुठल्या पार्टीची असो किंवा घरच्या एखाद्या भांडणाची. चित्रपटाच्या सेटपासून ...

Bollywood's 'Hey' celebrity came in for discussion | गॉसिप्समुळे चर्चेत आले बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी!

गॉसिप्समुळे चर्चेत आले बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी!

ong>अबोली कुलकर्णी 

सेलिब्रिटी म्हटल्यावर चर्चा ही आलीच. मग ती चर्चा कुठल्या पार्टीची असो किंवा घरच्या एखाद्या भांडणाची. चित्रपटाच्या सेटपासून ते घराच्या गॅलरीपर्यंत सेलिब्रिटींशी निगडित प्रत्येक बाब ही आपल्यासाठी ‘गॉसिप’ असते. बॉलिवूड वर्तुळात अशा खमंग चर्चांना नेहमीच ऊत येत असतो. पण, तुम्हाला माहितीये का, काही सेलिब्रिटी असे असतात जे सातत्याने चर्चेत असतात. २०१७ या वर्षात चर्चिले गेलेल्या काही सेलिब्रिटींचा आपण येथे आढावा घेऊया...

             

मीरा राजपूत
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही त्याच्यासोबत लग्नाअगोदरपासून चर्चेत होती. त्यांचा हनिमून, तिची प्रेगनंन्सी, आऊटिंग, मुलगी मीशासोबतची ट्रीप याबद्दलच्या सगळयाच गॉसिप्स फॅन्सनी चवीनी वाचल्या. तसेच मीरा देखील मीडिया फ्रेंडली असल्याने तिने केलेले स्टेटमेंट्स हे नेहमीच शाहिदच्या चाहत्यांसाठी महत्त्वाचे आहेत.

                             

सोनु निगम
गायक सोनु निगम अद्यापपर्यंत फारसा काही चर्चेत नसायचा. मात्र, एप्रिल महिन्यात त्याने मशिदींमध्ये अजानासाठी लावण्यात येणाऱ्या  लाऊडस्पीकरविषयी तक्रार नोंदवली. तेव्हापासून तो चांगलाच चर्चेत आला. सकाळीच या आवाजामुळे आम्ही झोपू शकत नाही, अशा आशयाचे टविट त्याने केले. त्याच्या टिवटसह तो चर्चेत आला. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून त्याचा फॅन्सनी विरोध केला.



सोनाक्षी सिन्हा

भारतात प्रसिद्ध गायक जस्टीन बीबर याचा म्युजिकल कॉन्सर्ट झाला. त्यावेळी या सोहळयात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने देखील परफॉर्म केले. अनेकांनी तिचे कौतुक केले. पण, काहींनी टिकांनी तिला झोडले. पद्मश्री पुरस्कारप्राप्त गायक कैलाश खेर यांना तिचा परफॉर्मन्स काही रूचला नाही. त्यांनी माध्यमांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. पण, याचा फायदा सोनाक्षीलाच झाला. यानिमित्ताने ती चर्चेत आली.

            

अभय देओल
चित्रपटांपासून सध्या थोडा दूर असलेला अभिनेता अभय देओल हा एका गोष्टीमुळे चांगलाच चर्चेत आला. झालं असं की, फेअरनेस क्रीमची जाहीरात करणाºया सेलिब्रिटींना त्याने धारेवर धरले. सोशल मीडियावर या सेलिब्रिटींची त्याने चांगलीच खरडपट्टी काढली. मात्र, चाहत्यांकडून त्याचे कौतुकच झाले. हा विषय सेलिब्रिटींच्या बाबतीत नेहमीच चर्चिला जातो. 

प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा ही आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. तिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूड चित्रपट, टीव्ही मालिका यांच्यामध्ये काम करत आहे. अशातच तिचा हॉलिवूडपट ‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी ती बर्लिन येथे गेली होती. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिनमध्ये होते. तिने त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मोदींच्या भेटीवेळी तिने घातलेल्या ड्रेसवरून ती नेटिझन्सकडून चांगलीच ट्रोल झाली. तिच्यावर टीकांचा भडिमार झाला. या ना त्या कारणाने ती चर्चेत होतीच. 
 

Web Title: Bollywood's 'Hey' celebrity came in for discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.