बॉलिवूडच्या या डॅशिंग अॅक्टर्सनी साकारले ‘ट्यूबलाइट’ कॅरेक्टर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 15:44 IST2017-06-07T10:10:45+5:302017-06-07T15:44:29+5:30
पडद्यावर नेहमीच दमदार आणि डॅशिंग भूमिका साकारणारे कलाकार जेव्हा साध्याभोळ्या भूमिकेत पडद्यावर झळकतात, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना धक्का बसल्याशिवाय राहात ...

बॉलिवूडच्या या डॅशिंग अॅक्टर्सनी साकारले ‘ट्यूबलाइट’ कॅरेक्टर!
सलमान खान
खरं तर सलमानने आतापर्यंत अॅक्शन, रोमॅण्टिक आणि संस्कारी भूमिका साकारल्या आहेत; परंतु तो पहिल्यांदाच अशाप्रकारची साध्याभोळ्या व्यक्तीची भूमिका साकारत असल्याने त्याच्या चाहत्यांना याविषयी प्रचंंड उत्सुकता लागली आहे. मात्र अशी भूमिका साकारणारा सलमान इंडस्ट्रीमधील पहिलाच डॅशिंग अभिनेता नसून, इतरही काही डॅशिंग अभिनेत्यांनी पडद्यावर ‘ट्यूबलाइट’ भूमिका साकारल्या आहेत. त्याचाच हा आढावा घेणारा वृत्तांत...
शाहरूख खान
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याला अॅक्शनबरोबरच रोमॅण्टिक भूमिकांसाठी ओळखले जाते. मात्र ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटात त्याने आपल्या इमेजला शोभेल त्या पलीकडची भूमिका साकारून त्याच्या चाहत्यांना धक्का दिला होता. चित्रपटात शाहरूख अनुष्का शर्माच्या साध्याभोळ्या पतीच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील त्याची ‘ट्यूबलाइट’ इमेज त्यावेळी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.
हृतिक रोशन
बॉलिवूडचा हंक म्हणून ओळखल्या जाणाºया हृतिक रोशनच्या अॅक्शनचा जलवा अनेकांनी बघितला आहे. मात्र हृतिकने ‘कोई मिल गया’ या चित्रपटात इमेजच्या विपरीत भूमिका साकारून चाहत्यांना जबरदस्त धक्का दिला होता. चित्रपटात तो एकदमच ‘ट्यूबलाइट’ दाखविण्यात आला होता. हृतिकची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.
अजय देवगन
‘सिंघम’ म्हणून ओळखला जाणारा अजय देवगण सध्या अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटांवर फोकस करून आहे. मात्र काही वर्षांपूर्वी त्यानेदेखील पडद्यावर ‘ट्यूबलाइट’ची भूमिका साकारली होती. २००५ मध्ये आलेल्या ‘मैं ऐसा ही हूं’ या चित्रपटात अजय मानसिकदृष्ट्या अपरिपक्व दाखविण्यात आला होता. त्याने या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला होता.
अनिल कपूर
८० च्या दशकात अनिल कपूरचा जलवा बघण्यासारखा होता. मात्र याच दशकाच्या अखेरीस त्याने पडद्यावर ‘ईश्वर’ साकारून चाहत्यांना चांगलाच धक्का दिला होता. या चित्रपटात तो साध्याभोळ्या तरुणाच्या भूमिकेत बघावयास मिळाला होता. ‘ईश्वर’ हा चित्रपट ‘स्वाती मुथ्यम’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. ज्यामध्ये कमल हसनने मुख्य भूमिका साकारली होती.
धर्मेंद्र
धर्मेंद्र हे नाव आजही ऐकावयास मिळाले तरी, त्यांच्या डॅशिंग भूमिकांची आठवण होते. त्याकाळात धरम पाजीने अशा काही धमाकेदार भूमिका साकारल्या होत्या, ज्यामुळे त्यांची अॅक्शन हीरो म्हणून ओळख झाली होती. मात्र १९८२ मध्ये आलेल्या ‘गजब’ या चित्रपटात त्यांनी डबल रोल साकारून अनेकांना आश्चर्यचकित केले होते. धरम पाजीची आॅनस्क्रीन इमेज बघता त्यांची हे भूमिका चाहत्यांसाठी सरप्राइज होती.