बॉलिवूडवर अधिराज्य करायचेय - प्रियंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:30 IST2016-01-16T01:11:49+5:302016-02-06T05:30:29+5:30
बॉलीवुडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केल्यानंतर आता सर्वांच्या लाडक्या प्रियंकाने तिचा मोर्चा हॉलीवुडकडे वळवला आहे. तिचा म्युझिक अल्बम आणि ...

बॉलिवूडवर अधिराज्य करायचेय - प्रियंका
ब लीवुडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केल्यानंतर आता सर्वांच्या लाडक्या प्रियंकाने तिचा मोर्चा हॉलीवुडकडे वळवला आहे. तिचा म्युझिक अल्बम आणि टीव्ही शो यामुळे प्रियंकाला जागतिक पातळीवर ओळख मिळाली आहे. अमेरिकन मालिका 'क्वांटीको' आणि बॉलीवुडचा चित्रपट 'बाजीराव मस्तानी'या दोन्हींचे चित्रीकरण करताना प्रियंकाला तारेवरची कसरत करावी लागत होती. याबाबत बोलताना पिग्गी चॉप्स म्हणाली, 'जर तुम्हाला जगात तुमचे स्थान निर्माण करायचे असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत तर घ्यावीच लागणार. माझ्या बाबतीतही तेच आहे. दोन्ही गोष्टी हॅण्डल करणे हा माझा निर्णय होता. आणि ते मी यशस्वीपणे करत आहे.' ही तारेवरची कसरत करताना प्रियांकाचे तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे परंतु तरीही यामुळे मिळणार्या आनंदामुळे ती अतिशय समाधानी आहे.