​बॉलिवूड सेलिब्रेटींचे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 19:07 IST2016-12-15T19:07:00+5:302016-12-15T19:07:00+5:30

बॉलिवूडमधील एकेकाळी आघाडीवर असलेली अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच वर्षी जून महिन्यात उद्योगपती संजय कपूरसोबत ...

Bollywood celebrities 'live in relationship' | ​बॉलिवूड सेलिब्रेटींचे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’

​बॉलिवूड सेलिब्रेटींचे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’

ong>बॉलिवूडमधील एकेकाळी आघाडीवर असलेली अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच वर्षी जून महिन्यात उद्योगपती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यावर ती एकाकी पडली होती. मात्र तिचे हे एकाकीपण लवकरच दूर होणार आहे. करिश्मा आपला बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवाल याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहण्यास तयार झाली असल्याचे सांगण्यात येते. दोघेही एका मोठ्या घराच्या शोधात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. संदीपसोबत करिश्मा व तिची दोन्ही मुले कियरा व सायमारा एकत्र राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘लिव्ह इन  रिलेशनशीप’मध्ये राहणारी करिश्मा पहिली अभिनेत्री नसून, यापूर्वी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी यांनी लग्नापूर्वीचा संसार थाटला आहे. 

bollywood stars who stay in live in realtionship-kareena-saif

करिना कपूर - सैफ अली खान 
करिश्मा कपूरची लहान बहीण करिना कपूर ही देखील पती सैफ अली खान बरोबर लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिली आहे. २००८ साली दोघांनी यशराज बॅनरच्या ‘टशन’ या चित्रपटात एकत्र भूमिका केल्या होत्या. ‘टशन’च्या सेटवर दोघांत प्रेमांकुर फुलले. सैफने करिनाला प्रपोज केल्यावर दोघांनी लग्नापूर्वी एकत्र राहण्याचा विचार केला. सुमारे ५ वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये राहिल्यावर दोघांनी आपल्या रिलेशनशीपला लग्नाचा स्टेटस दिला. दोघांनी २०१२ साली विवाह केला. आता लवकरच करिना आई होणार आहे. 

bollywood stars who stay in live in realtionship-ranbir-katrina

रणबीर कपूर - कॅटरिना कैफ 
करिश्माचा चुलत भाऊ अभिनेता रणबीर कपूर हा सध्या सिंगल असला तरी त्याने अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ शेअर केली आहे. दोघांची भेट २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’च्या सेटवर झाली होती. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजनीती’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांत काहीतरी सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. २०१४ साली दोघांनी ‘लिव्ह इन’मध्ये राहण्यास सुरुवात केली. मात्र दीड वर्षांतच दोघेही वेगळे होणार अशा बातम्या येऊ लागल्या. २०१६ सालच्या सुरुवातीला रणबीरने कॅटरिनासोबत शेअर केलेले घर सोडले. आता रणबीर आपल्या नव्या घरात लवकरच शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 

bollywood stars who stay in live in realtionship-john-bipasha

जॉन अब्राहम - बिपाशा बसू 
बॉलिवूडचा हंक म्हणून ख्यात असलेल्या जॉन अब्राहम व बिपाशा बसू यांनी २००३ साली ‘जिस्म’ या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. याचवेळी दोघांत जवळीक वाढली. जॉन व बिपाशाने ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. सुमारे ९ वर्षे दोघेही नात्यात होते, दोघांच्या प्रेमाला व ‘लिव्ह इन’ स्टेटसला मीडियात चांगलीच जागा मिळत असताना अचानक दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले होते. २०१४ साली जॉन अब्राहमने प्रिया रुंचल हिच्याशी लग्न करून आपला संसार थाटला. तर दोन वर्षानंतर याच वर्षी (२०१६) बिपाशा बसूने टीव्ही स्टार करण सिंग ग्रोव्हर याच्याशी विवाह केला. 

bollywood stars who stay in live in realtionship-sushant-ankita

सुशांत सिंग राजपूत - अंकिता लोखंडे 
अभिनेता सुशांत सिंग राजपूत व टीव्ही स्टार अंकिता लोखंडे यांच्यात असलेले ‘लिव्ह इन’ चांगलेच चर्चेत होते. बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करण्याआधी सुशांत सिंगची ओळख टीव्ही स्टार म्हणून होती. अंकिता व सुशांतची भेट ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर झाली. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. अनेक अवॉर्ड फंक्शन व आणि फिल्मी व टीव्ही दुनियेतील पार्ट्यांमध्ये दोघेही एकत्र दिसत होते, मात्र लग्नाआधी ६ वर्षे एकत्र राहिल्यावर दोघांनी २०१६ च्या सुरुवातीला वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सुशांत आता बॉलिवूडमध्ये तर अंकिता टीव्हीच्या दुनियेत खूष आहे. 

bollywood stars who stay in live in realtionship-ranveer-konkana

रणवीर शौरी - कोंकणा सेन शर्मा 
एमटीव्ही व्हीजे ते बॉलिवूड अभिनेता असा प्रवास करणारा रणवीर शौरी व व्हर्साटाईल अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा यांनी २००८ साली डेटिंग सुरू केले होते. दोघांनी लग्नाआधी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. सुमारे दोन वर्षे एकत्र ‘लिव्ह इन’मध्ये राहिल्यावर दोघांनी २०१० साली लग्न केले. मात्र पाच वर्षे एकत्र राहिल्यावर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांना हारुण हा मुलगा असून मागील वर्षी (२०१५) रणवीर व कोंकणा यांनी घटस्फोट घेतला. 

bollywood stars who stay in live in realtionship-anurag-kalki

अनुराग कश्यप - कल्की कोच्लिन 
चित्रपट निर्माता व दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री कल्की कोच्लिन यांची भेट २००८ साली ‘देव डी’च्या सेटवर झाली होती. त्यावेळी अनुराग कश्यप यांचे लग्न झाले होते व त्याला एक मुलगी देखील होती. याच काळात अनुराग व त्याची पत्नी आरती बजाज यांच्यात घटस्फोट झाला. अनुरागचे नाव कल्कीसोबत जोडण्यात आले. दोघेही सुमारे दीड वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये एकत्र राहिल्यानंतर २०११ साली दोघांनी लग्न के ले, मात्र त्यांचा संसार अधिक काळ चालू शकला नाही. २०१५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. 

bollywood stars who stay in live in realtionship-soha-kunal

सोहा अली खान - कुणाल खेमू
सैफ अली खानची बहीण अभिनेत्री सोहा अली खान हिने अभिनेता कुणाल खेमू सोबत याचवर्षी (२०१६) लग्न केले. मागील ३ वर्षांपासून दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये राहत होते. दोन व्यक्तीमध्ये प्रेम व विश्वास आवश्यक आहे असे सांगत सोहाने आपल्या रिलेशनशीप स्टेटसचा उल्लेख केला होता. दरम्यान दोघांत काही चांगले नसल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र सध्यातरी दोघांचा संसार चांगला सुरू आहे.

bollywood stars who stay in live in realtionship-kanagana-Aaditya-pancholi

कंगना राणौत - आदित्य पांचोली
कंगना राणौत आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र सुरुवातीच्या काळात कंगना अभिनेता आदित्य पांचोलीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये होती. आदित्य पांचोलीचे लग्न झाले होते व त्याला दोन मुले होती तरी देखील तो कंगनाचे घर शेअर करीत होता. कं गनासोबत ब्रेकअप झाल्यावर आदित्य पांचोली याने आपण रिलेशनशीपमध्ये होतो याची कबुली दिली. दोघेही सुमारे २ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये होते. आता मात्र दोघांत कोणतेच नाते नाही. 

bollywood stars who stay in live in realtionship-amir-khan-kiran-rao

आमिर खान - किरण राव
बॉलिवूड स्टार आमिर खान व किरण राव हे देखील लग्नापूर्वी सुमारे दीडवर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ होते. आमिरने १९८६ साली रिना दत्ता हिच्याशी लग्न केले होते. दोघांनी जुनैद व इरा नावाची मुले आहेत. मात्र दोघांत दुरावा निर्माण होत असतानाच २००१ साली ‘लगान’च्या सेटवर त्याची किरण रावशी भेट झाली. २००२ साली रिनाशी काडीमोड घेतल्यावर आमिर व किरण यांनी ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. लग्नापूर्वी दीड वर्षे एकत्र राहिल्यावर २००५ साली आमिर व किरण यांनी विवाह केला. दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘दंगल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Bollywood celebrities 'live in relationship'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.