बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हटके लग्नपत्रिका, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 15:03 IST2018-05-05T09:33:29+5:302018-05-05T15:03:29+5:30
जेव्हापासून अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हापासून लोकांमध्ये एकच चर्चा रंगत आहे की, एवढ्या मोठ्या ...

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हटके लग्नपत्रिका, पाहा फोटो!
अनुष्का शर्मा-विराट कोहली
विरूष्काच्या रिसेप्शन पार्टीच्या इन्व्हिटेशन किटमध्ये सर्वात आकर्षक होते ते छोटेसे रोपटे, जे त्यांच्या प्रेमाची निशाणी होते. त्याव्यतिरिक्त त्यामध्ये चॉकलेट्स आणि ट्रफल्सदेखील होते. या दाम्पत्याने ११ डिसेंबर २०१७ रोजी इटली येथे लग्न केले. त्यानंतर दिल्ली आणि मुंबई येथे ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी दिली.
युवराज सिंग-हेजल कीच
क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांनी आपल्या लग्नाची थीम म्हणून क्रिकेटचीच निवड केली होती. तसेच ‘युवराज अॅण्ड हेजल प्रीमियर लीग’ असे त्याचे नावही ठेवले होते. लग्नपत्रिकेवर त्यांनी दोघांचेही कार्टून रेखाटले होते. त्यामध्ये युवराज क्रिकेट खेळताना दिसत होता. कार्डसोबत त्यांनी फ्लेवर्ड ड्राय फ्रूट्सचे डबे आणि चॉकलेट्सही दिले होते.
शाहिद कपूर-मीरा राजपूूत
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाची पत्रिका तर आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण त्यांनी त्यांच्या लग्नाची पत्रिका अतिशय साध्या पद्धतीने छापली होती. या पत्रिकेबरोबर त्यांनी मधाची बाटली आणि हर्बल टी पाहुण्यांना गिफ्ट दिली होती.
करिना कपूर-सैफ अली खान
करिना कपूर आणि सैफ अली खान यांनी त्यांचे रिसेप्शन कार्ड अतिशय सिम्पल पद्धतीने छापले होते. मात्र त्यास रॉयल टचदेखील दिला होता. दोघे १६ आॅक्टोबर २०१२ रोजी लग्नाच्या बंधनात अडकले होते. पुढे १८ आॅक्टोबर रोजी सैफीनाने त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली होती.
इमरान खान-अवंतिका मलिक
आमिर खानचा भाचा इमरान खानच्या लग्नाची पत्रिका एका डायरीप्रमाणे होती. हे एक ईयर प्लॅनर होते. ज्याच्या पहिल्याच पानावर पिनव्हील चिटकविण्यात आले होते. याच पानावर एक चिटदेखील होते. ज्यामध्ये लग्नाबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली होती.
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचे निमंत्रण देताना तीन डब्बे देण्यात आले होते. त्यातील एक डब्यात लग्नपत्रिका, दुसºया डब्यात स्वीत्झर्लंडहून मागविण्यात आलेले खास चॉकलेट्स तर तिसºया डब्यात अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेली एक सुंदर कविता होती.