बॉलिवूडही अफगाणिस्तानच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:35 IST2016-01-16T01:07:36+5:302016-02-05T12:35:02+5:30
मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचा दौरा केला. तेथील नवनिर्मित संसद इमारतीमध्ये संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतीय चित्रपट आणि ...

बॉलिवूडही अफगाणिस्तानच्या प्रेमात
म गच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचा दौरा केला. तेथील नवनिर्मित संसद इमारतीमध्ये संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतीय चित्रपट आणि अफगाणिस्तान यांच्या नात्यांचा उल्लेख केला. ऐवढेच नाही, मोदी यांनी आपल्या भाषणात प्रकाश मेहरा यांच्या जंजीरमधील 'यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी..' गीताच्या ओळी स्मरून उपस्थितांकडून टाळ्यांची दादही मिळवली. मोदी जे बोलले ते खरे आहे. अमिताभ बच्चन पासून शाहरुखखान पर्यंतच्या कलाकारांचे येथे मोठे चाहते आहेत. हिंदी चित्रपट आणि अफगाणिस्तानचा संबंध पहिल्यांदा काबुलीवाला या चित्रपटाच्या निमित्ताने आला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या उपन्यासावर १९६१ मध्ये तयार झालेल्या या चित्रपटात बलराज साहनी यांनी केंद्रीय भूमिका वठवली होती. विमल रॉय निर्माते होते. यानंतर फिरोज खान यांच्या धर्मात्माचे चित्रीकरण काबूल ते कंधारपर्यंत अनेक स्थळांवर करण्यात आले होते. अफगाणिस्तानला फिरोज खान यांनी चित्रपटाच्या कथेचा हिस्सा बनविले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपर हिट झाला. धर्मात्मा नंतर फिरोज खान यांनी त्यांचा मुलगा फरदीनला लाँच करतानाही जानशी चित्रपटाचा काही भाग अफगाणिस्तानात शूट केला होता. 'खुदागवाह'ची कथाही याच देशाच्या सभोवताल गुंफली होती. यात अमिताभ बच्चन यांनी अफगाणी पठाणची भूमिका केली होती. स्वत: अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाच्या शूटिंगच्या अनुभवांची आठवण करीत एकदा सांगितले होते की, चित्रपटाची शूटिंग सुरू होती आणि जवळच बॉम्बस्फोट झाला. यात संपूर्ण यूनिट बालंबाल बचावले. त्यावेळी तत्कालीन अफगान सरकारने बिग बी आणि चित्रपटाच्या संपूर्ण यूनिटला कडक सुरक्षा प्रदान केली होती. खुदा गवाहच्या अनेक वर्षांनंतर अफगाणिस्तानात कबीर खानच्या काबुल एक्सप्रेसची शूटिंग करण्यात आली. यशराजद्वारा बनविण्यात आलेल्या या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत जान अब्राहम आणि अरशद वारसी होते. जे पत्रकार बनून तेथे येतात आणि अडचणींमध्ये फसतात. मनीषा कोईरालाने काही वर्षांपूर्वी स्केप फ्राम तालिबान या चित्रपटात काम केले होते. मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे याची शूटिंग तेथे करण्यात आली नाही.