'या' बॉलिवूड सुंदरीने नाकारली सलमानच्या बिग बॉसची ऑफर; कारण सांगत म्हणाली-"वाईट बोलणं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 10:31 IST2025-07-17T10:28:57+5:302025-07-17T10:31:52+5:30
सलमानच्या 'या' अभिनेत्रीचा बिग बॉसमध्ये जाण्यास नकार, म्हणाली...

'या' बॉलिवूड सुंदरीने नाकारली सलमानच्या बिग बॉसची ऑफर; कारण सांगत म्हणाली-"वाईट बोलणं..."
Zareen Khan: 'बिग बॉस' (Bigg Bosss)हा टेलिव्हीजनवरील एक लोकप्रिय शो आहे. अनेकजण हा शो मोठ्या आवडीने पाहतात. आता लवकरच बिग बॉस हिंदीचं १८ वं पर्व सुरु होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण आहे. दरम्यान, या पर्वात कोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या शोसाठी बऱ्याच कलाकारांना ऑफर देण्यात आली होती. यंदाच्या पर्वासाठी बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीला देखील विचारणा करण्यात आली होती, परंतु तिने ती नाकारली. ही अभिनेत्री म्हणजे जरीन खान (Zareen Khan) आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने बिग बॉसची ऑफर नाकारल्याचा खुलासा केला.
सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जरीन खानने नुकतंच 'बिग बॉस' शोबद्दल आपले मत मांडलं आहे. जरीनला या शोसाठी अनेकदा ऑफर आली आहे, पण तिने ती नाकारली. नुकतीच अभिनेत्रीने 'हिंदी रश'ला मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली, मला शो खूप आवडतो. माझ्या कामामुळे मी बिग बॉसचे २-३ पर्व मला पाहताच आले नाहीत. पण, मी तो शो बघते.
मग जरीनने म्हटलं, "माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. म्हणूनच मी जवळपास तीन महिने घरापासून कुठेतरी लांब राहण्याचा विचारही करू शकत नाही. मला वाटत नाही की माझं घर माझ्याशिवाय चालेल. कारण, मला बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. जर मी एक दिवसही बाहेर गेले तरीहीमाझ्या आईला सतत फोन लावून तिच्या तब्येतीची आणि इतर गोष्टी विचारण्यासाठी करते. सगळ्यात मोठं कारण हेच आहे. "
त्यानंतर 'बिग बॉस हिंदी'ची ऑफर नाकारण्यामागचं कारण सांगत जरीन म्हणाली, "दुसरं म्हणजे, मला वाटत नाही की मी अशा घरात राहू शकेन जिथे मी लोकांना ओळखत नाही. मी मित्र बनवण्यात वेळ घालवत नाही, पण मला माहित नाही की मला किती आरामदायी असेन. याशिवाय, सगळ्यात मोठं कारण म्हणजे मी वाईट बोलणं सहन करू शकत नाही. तसंच गैरवर्तन केलेलंही मला पटणार नाही. मी कोणावर तरी हात उचलेन आणि मला शोच्या बाहेर काढलं जाईल. म्हणून न जाणं चांगल आहे.
वर्कफ्रंट
जरीन खान २००९ साली सलमान खानच्या वीर या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'हेट स्टोरी 4', 'अक्सर 2', '1921', 'वजह तुम हो' सह अनेक सिनेमे केले. मात्र तिला फारसं यश मिळालं नाही.