'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाले प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 13:15 IST2018-04-25T07:40:08+5:302018-04-25T13:15:39+5:30

 प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लंडनमध्ये 19 मे रोजी ते दोघे लग्नाच्या गाठीत अडकणार ...

'The' Bollywood Actress Receives Prince Harry And Megan Markle's Wedding Invitation | 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाले प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाले प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

 
्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लंडनमध्ये 19 मे रोजी ते दोघे लग्नाच्या गाठीत अडकणार आहेत. या लग्नाचे आमंत्रण  बॉलिवूडमधील देखील एक अभिनेत्रीला आले आहे. आता तुम्ही विचार करत असाल ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण ? ती दुसरी तिसरी कोणी नसून देसी गर्ल प्रियांका चोप्रा आहे. लेटेस्ट रिपोर्टनुसार 19 मे रोजी होणाऱ्या लग्नाच्या पाहुण्याच्या यादीत प्रियांकाचे नावदेखील सामील आहे. प्रियांका हॉलिवूड अभिनेत्री मेगनची खूप चांगली मैत्रिण आहे.  
फॉरन मीडियाने हे कंफर्म केले आहे की प्रियांका चोप्रा मेगन आणि  प्रिन्स हॅरीच्या रॉयल लग्नाला उपस्थित राहणार आहे. एका पोर्टलच्या रिपोर्टनुसार प्रियांका मेगनच्या या खास दिवसाला घेऊन खूप खुश आहे.   



लवकरच प्रियांका बॉलिवूडध्ये कमबॅक करणार आहे. सलमान खानच्या ‘भारत’मधून प्रियांका बॉलिवूडमध्ये वापसी करतेय.  सर्वातआधी 2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात सलमान व प्रियांका एकत्र दिसले होते. यानंतर ‘सलाम ए इश्क’ आणि ‘गॉड तुस्सी गे्रट हो’मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. ‘भारत’साठी प्रियांकाने मानधनापोटी भली मोठी रक्कम घेतल्याचे कळतेय. म्हणजेच हॉलिवूड रिटर्न देसी गर्लचे भाव वधारले आहेत.

​ALSO READ :   अबब... प्रियांका चोप्राच्या ‘या’ ड्रेसची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल!

तूर्तास प्रियांका या चित्रपटात कुठली भूमिका साकारणार, हे गुलदस्त्यात आहे. पण सलमानच्या भूमिकेबद्दल मात्र काही रोचक माहिती समोर आली आहे. होय, 52 वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक  वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. आता यंग दिसायचे तर वजनही कमी करणे आलेच. त्यानुसार, पुढच्या काही आठवड्यात सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. म्हणजेच सलमानला पुन्हा एकदा जिममध्ये घाम गाळावा लागून कडक डाएट फॉलो करावे लागेल.

Web Title: 'The' Bollywood Actress Receives Prince Harry And Megan Markle's Wedding Invitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.