बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला विनामेकअपमध्ये ओळखणं झालंय कठीण, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:56 PM2020-03-02T12:56:06+5:302020-03-02T12:56:53+5:30

विना मेकअप लूकमध्ये या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण

Bollywood Actress Kajal Aggrawal shared without makeup photo on Instagram | बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला विनामेकअपमध्ये ओळखणं झालंय कठीण, पहा तिचे फोटो

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला विनामेकअपमध्ये ओळखणं झालंय कठीण, पहा तिचे फोटो

googlenewsNext


अशी एकवेळ होती जेव्हा बॉलिवूडच्या अभिनेत्री विनामेकअप समोर येण्यासाठी तयार नव्हत्या. आता वेळ खूप बदलला आहे आणि अभिनेत्री विनामेकअप चाहत्यांसमोर येण्यासाठी घाबरत नाहीत. बऱ्याच अभिनेत्रींनी नो मेकअप लूकमधील सेल्फी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. तर काही अभिनेत्री विथआऊट मेकअप स्पॉट झाल्या आहेत. त्यात आता अभिनेत्री काजल अग्रवाल हिने सोशल मीडियावर विनामेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे.


बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल हिने बॉलिवूडशिवाय साऊथ सिनेइंडस्ट्रीतदेखील तिचे मोठे नाव आहे. काजलने नुकताच विनामेकअपमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत काजलने लिहिले की, लोक स्वतःला जास्त शोधू शकत नाहीत. आपण अशा एका जगात राहतो जिथे लोक बाहेरचे सौंदर्य पाहण्यासाठी वेडे आहे. कारण सोशल मीडियावर  अशाच सौंदर्याला जास्त वाव मिळतो आहे. लाखो रुपयांचे कॉस्मेटिक्स आणि सौंदर्याच्या प्रोडक्टवर पैसे खर्च केले जातात.


काजलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या ती दोन साऊथच्या सिनेमात बिझी आहे. लवकरच ती ‘मुंबई सागा’ या सिनेमात झळकणार आहे. 

काजलने साऊथच्या अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. रजनीकांत, चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, प्रभास, ज्युनिअर एनटीआर, रामचरण अशा अनेकांसोबत ती दिसली आहे. काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

 त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये लक्ष्मी कल्याणम या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.

मात्र काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून. काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
 

Web Title: Bollywood Actress Kajal Aggrawal shared without makeup photo on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.