वर्कआऊट करताना जमिनीवर आपटली अन्...; बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 14:39 IST2024-06-06T14:38:32+5:302024-06-06T14:39:12+5:30
एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री बॉल वर्कआऊट करताना दिसत आहे.

वर्कआऊट करताना जमिनीवर आपटली अन्...; बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल
कलाकारांची लाइफस्टाइल हा कायमच चर्चेचा विषय असतो. फिट राहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी खूप मेहनत घेताना दिसतात. सेलिब्रिटी फिट राहण्यासाठी डायटिंगबरोबरच व्यायाम आणि योगाला महत्त्व देताना दिसतात.अनेक सेलिब्रिटींचे व्यायाम करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडिओ समोर आला आहे.
इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री बॉल वर्कआऊट करताना दिसत आहे. वर्कआऊट करताना बॉलवर उडी मारायच्या नादात अभिनेत्री पाय घसरून खाली पडते. लगेचच तिच्या बाजूला उभा असलेला ट्रेनर तिला पकडत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता. "ट्रेनर सुपरव्हिजन आणि क्रॅश मॅट्सशिवाय हे घरी ट्राय करू नका", असं तिने म्हटलं आहे.
व्हिडिओत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे अलाया फर्निचरवाला. अलाया अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. तिने २०२० मध्ये 'जवानी जानेमन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर कार्तिक आर्यनसोबत ती 'फ्रेडी' सिनेमात दिसली होती. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'बडे मियां छोटे मियां' सिनेमातही अलाया झळकली होती.