मुलीला कसं पटवायचं? चाहत्याचा शाहरूखला प्रश्न; 'जवान'ला शब्दच खटकला अन्...

By ओमकार संकपाळ | Published: August 10, 2023 10:11 PM2023-08-10T22:11:47+5:302023-08-10T22:11:47+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान त्याचा आगामी चित्रपट 'जवान'चे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.

 Bollywood actor Shah Rukh Khan is promoting his upcoming film Jawan and he answered a fan's unique question during an asksrk session  | मुलीला कसं पटवायचं? चाहत्याचा शाहरूखला प्रश्न; 'जवान'ला शब्दच खटकला अन्...

मुलीला कसं पटवायचं? चाहत्याचा शाहरूखला प्रश्न; 'जवान'ला शब्दच खटकला अन्...

googlenewsNext

Ask SRK Session : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान त्याचा आगामी चित्रपट 'जवान'चे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. शाहरूखला त्याच्या रोखठोक स्वभावासाठी देखील ओळखले जाते. शाहरूख नेहमी #asksrk सेशन चालवत असतो आणि या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधतो. गुरूवारी देखील बॉलिवूडच्या 'जवान'ने या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. दरम्यान, एका चाहत्याने शाहरूखला असा प्रश्न विचारला की शाहरुख खानलाही चोख उत्तर द्यावे लागले. मुलींना कसे इम्प्रेस करायचे असे चाहत्यांने विचारले असता शाहरूखने चाहत्याने वापरलेल्या शब्दावरच आक्षेप घेतला.

#asksrk च्या माध्यमातून चाहत्याने शाहरूखला विचारले की, सर जी, मुलीला कसे पटवायचे, काही टिप्स द्या. यावर उत्तर देताना शाहरुखने लिहिले, "पहिले तर हे 'पटना पटाना' हे असलं काय बोलू नकोस, ते चांगलं दिसत नाही." शाहरूख खान 'पठाण' चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. शाहरुख खान 'जवान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

७ सप्टेंबरला 'जवान' प्रेक्षकांच्या भेटीला
शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. शाहरुखच्या जवानमध्ये मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अटली कुमारने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 'जवान'चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या चित्रपटातील गाणीही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत.

Web Title:  Bollywood actor Shah Rukh Khan is promoting his upcoming film Jawan and he answered a fan's unique question during an asksrk session 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.