'१२ फेल' फेम विक्रांत मेस्सीची नव्या चित्रपटात वर्णी; पॉलिटिकल थ्रिलरवर आधरित चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:07 PM2024-01-16T16:07:24+5:302024-01-16T16:09:42+5:30

'१२ फेल' च्या यशानंतर अभिनेता विक्रांत मेस्सीच्या हाती नवा सिनेमा मिळाला आहे. 

Bollywood 12th fail cinema actor vikrant massey roped in sabarmati report political thriller based movie | '१२ फेल' फेम विक्रांत मेस्सीची नव्या चित्रपटात वर्णी; पॉलिटिकल थ्रिलरवर आधरित चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

'१२ फेल' फेम विक्रांत मेस्सीची नव्या चित्रपटात वर्णी; पॉलिटिकल थ्रिलरवर आधरित चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Vikrant Massey : सध्या हिंदी मनोरंजन विश्वात चर्चा रंगतेय ती '१२ फेल' या प्रेरणादायी सिनेमाची. या चित्रपटामुळे अभिनेता विक्रांत मेस्सीसह अभिनेत्री मेधा शंकर यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित १२ फेल सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता हा अभिनेता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एका ज्वलंत विषयावर आधारित असलेल्या सिनेमातून विक्रांत नव्या रुपात  प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सांगितले जाते. 

'द साबरमती रिपोर्ट' या पॉलिटिकल थ्रिलरवर आधरित चित्रपटात विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात विक्रांतसोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हा सिनेमा ३ मे २०२४ ला चित्रपटगृहात झळकण्याची शक्यता आहे. 'ग्रहण' या वेबसीरीजचे दिग्दर्शक रंजन चंदेल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. याची माहिती रंजन चंदेल यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे.

येथे पाहा :

लाखो चाहत्यांना आपल्या अभिनयाने वेड लावणारा विक्रांत  राजकीय थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून नव्या रुपात पाहायला मिळणार आहे.  बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर यांच्या बाळाजी टेलिफिल्म्स समवेत विक्रांत काम करणार आहे.

Web Title: Bollywood 12th fail cinema actor vikrant massey roped in sabarmati report political thriller based movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.