Boldness Alert! राधिका आपटेचा बोल्ड ब्लॅक अँड व्हाइट फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 12:50 PM2021-02-26T12:50:09+5:302021-02-26T12:50:42+5:30

Radhika Apte's Bold Photos: राधिका आपटेचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

Boldness Alert! Bold black and white photo of Radhika Apte is going viral | Boldness Alert! राधिका आपटेचा बोल्ड ब्लॅक अँड व्हाइट फोटो होतोय व्हायरल

Boldness Alert! राधिका आपटेचा बोल्ड ब्लॅक अँड व्हाइट फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिचा कधी फोटो तर कधी व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. नुकताच तिने ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हा तिचा बोल्ड फोटो असून तो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

राधिका आपटे हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. तिने हा फोटो शेअर करत थ्रोबॅक असे लिहिले आहे. या फोटोत ती क्लीवेज दाखवताना दिसते आहे. 

राधिका आपटे हिच्या सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे घो मला असला हवा. घो मला असला हवा हा चित्रपट २००९ साली रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती केबीसी प्रोडक्शन्सने केली असून या चित्रपटात राधिकाने गावातील सावित्री या महिलेची भूमिका केली होती.

राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.


राधिका अ कॉल टू स्पाय या इंटरनॅशनल चित्रपटात झळकली होती. यात ती नूर इनायत खान नामक हेरची भूमिका साकारली होती. या सिनेमात स्टोरी वर्ल्ड वॉर टूमधील महिला हिरोंची माहित नसलेली स्टोरी दाखवण्यात आली आहे.

राधिका आपटेचा घोल या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये राधिका आपटे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Boldness Alert! Bold black and white photo of Radhika Apte is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.