‘भारत’मधून बॉबी देओल ‘आऊट’! सुनील ग्रोव्हर बनणार भाईजान सलमानचा मित्र!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 14:30 IST2018-04-20T09:00:29+5:302018-04-20T14:30:29+5:30
गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि बॉबी देओल यांच्या मैत्रीच्या चर्चा जोरात आहेत. या मैत्रीखातर सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये ...
.jpg)
‘भारत’मधून बॉबी देओल ‘आऊट’! सुनील ग्रोव्हर बनणार भाईजान सलमानचा मित्र!!
ग ल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि बॉबी देओल यांच्या मैत्रीच्या चर्चा जोरात आहेत. या मैत्रीखातर सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये बॉबीची वर्णी लागल्याची खबर आली. ही बातमी ऐकून बॉबीचे चाहते हरकले नसले तर नवल? पण आता नवी बातमी ऐकून बॉबीच्या चाहत्यांची घोर निराशा होणे अटळ आहे. होय, ताजी बातमी खरी मानाल तर ‘भारत’मधून बॉबीचा पत्ता कट झालाय अन् त्याच्या जागी कॉमेडियन सुनील ग्रोव्हरला हा चित्रपट आॅफर झालाय. सुनील ग्रोव्हर यात सलमानच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. पण केवळ विनोदी ‘पंच’ मारणाºया मित्राच्या नाही तर तो एका महत्त्वपूर्ण भूमिकेत यात दिसणार आहे. एकंदर काय तर सुनीलचे नशीब सध्या जोरावर आहे. अगदी काही दिवसांपूर्वीचं सुनीलने विशाल भारद्वाज यांचा ‘छुरियां’ साईन केला. या सुनील लीड रोलमध्ये दिसणार असल्याचे कळतेय. ‘छुरियां’चे शूटींग सुरू होत नाही तोच सुनीलच्या झोळीत दुसरा मोठा चित्रपट पडला आहे. तोही सलमान खानचा. अर्थात सुनीलचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा नाही. यापूर्वी ‘गब्बर इज बॅक’,‘बागी’,‘गजनी’सारख्या चित्रपटांत तो दिसला आहे. सुनीलने अलीकडे ‘धन धना धन’ या नव्या शोमधून टीव्हीवर वापसी केलीय. या शोमध्ये सुनील शिल्पा शिंदेसोबत दिसतोय.
ALSO READ : कपिल शर्मा बसला घरी, सुनील ग्रोव्हरला लागली लॉटरी!!
सलमानच्या ‘भारत’ बद्दल सांगायचे तर यात सलमान व प्रियांका चोप्रा लीड रोलमध्ये आहे. तूर्तास प्रियांका या चित्रपटात कुठली भूमिका साकारणार, हे गुलदस्त्यात आहे. पण सलमानच्या भूमिकेबद्दल मात्र काही रोचक माहिती समोर आली आहे. होय,५२ वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये १८ वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक वापरली जाणार आहे. आता यंग दिसायचे तर वजनही कमी करणे आलेच. त्यानुसार, पुढच्या काही आठवड्यात सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. म्हणजेच सलमानला पुन्हा एकदा जिममध्ये घाम गाळावा लागून कडक डाएट फॉलो करावे लागेल.