मलाईकाचा अफवांवर फनी रिप्लाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 01:55 IST2016-02-24T08:46:55+5:302016-02-24T01:55:31+5:30
मलाईका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाबद्दलच्या अफवांनी सोशल मीडिया हादरवून सोडले आहे.

मलाईकाचा अफवांवर फनी रिप्लाय!
म ाईका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाबद्दलच्या अफवांनी सोशल मीडिया हादरवून सोडले आहे. गेल्या आठवडाभरात ते दोघे घटस्फोट घेणार असल्याचे चर्चेत आहे. मात्र, ते एका ‘पॉवर कपल’ या शो साठी त्यांना एकत्र शूट करायचे होते. त्यादरम्यान ते एकमेकांशी बिल्कुल बोलत नव्हते, असे कळाले होते. एकमेकांसोबत शूट करायलाही ते तयार नव्हते. शो च्या आयोजकांनी त्यांना विनंती करून एकत्र आणले. यावर अरबाज खान सातत्याने टिष्ट्वटरवर अॅक्टिव्ह होता. पण, मलायका मात्र मुग गिळून गप्प होती. आता असं दिसतंय की, ती पण या अफवांना कंटाळलीय. तिनेही तिचे मत नोंदवायला सुरूवात केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ हे, आय फाऊंड युअर नोज, इट वॉज इन माय बिझनेस अगेन.’
source : all features.blogspot.in
source : all features.blogspot.in