birthday special : ​तुमच्या लाडक्या ‘मॅडी’चा आज वाढदिवस; पाहा, त्याची काही लोकप्रीय गाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 13:25 IST2017-06-01T07:55:59+5:302017-06-01T13:25:59+5:30

बॉलिवूडचा चॉकलेटी बॉय आर. माधवन याचा आज (१ जून) वाढदिवस. आज माधवन पूर्ण ४७ वर्षांचा झाला. जमशेदपूर येथे जन्मलेल्या आर. माधवनचे पूर्ण नाव रंगनाथन माधवन आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये तो ‘मॅडी’ नावाने परिचित आहे. माधवनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चित्रपटांची काही लोकप्रीय गाणी आज आम्ही तुम्हाला याठिकाणी ऐकवणार आहोत. ऐका तर...!

birthday special: Today's birthday for your funny 'Madi'; Look, some of his favorite songs! | birthday special : ​तुमच्या लाडक्या ‘मॅडी’चा आज वाढदिवस; पाहा, त्याची काही लोकप्रीय गाणी!

birthday special : ​तुमच्या लाडक्या ‘मॅडी’चा आज वाढदिवस; पाहा, त्याची काही लोकप्रीय गाणी!

लिवूडचा चॉकलेटी बॉय आर. माधवन याचा आज (१ जून) वाढदिवस. आज माधवन पूर्ण ४७ वर्षांचा झाला. जमशेदपूर येथे जन्मलेल्या आर. माधवनचे पूर्ण नाव रंगनाथन माधवन आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये तो ‘मॅडी’ नावाने परिचित आहे.  माधवन आधीपासूनच अभ्यासात हुशार होता. शिक्षण पूर्ण केल्यावर शिक्षक म्हणून तो कोल्हापुरात रूजूही झाला होता. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. माधवन अभिनेता झाला. खरे तर माधवनला ना शिक्षण बनायचे होते, ना अभिनेता. त्याला आर्मी आॅफिसर बनायचे होते. मात्र कमी वयामुळे तो आर्मीत जाऊ शकला नाही. यानंतर त्याने पब्लिक स्पिकींगचा कोर्स केला. याचदरम्यान त्याला एका जाहिरातीची आॅफर मिळाली. याचनंतर त्याने अनेक चित्रपटांसाठी स्क्रिन टेस्टही दिली. पण गोष्ट जमली नाही. मग त्याने आपला मोर्चा साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळवला. याठिकाणी मात्र माधवनला नशिबाने चांगली साथ दिली.
यानंतर माधवन् बॉलिवूडमध्येही आला. ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख दिली. हा चित्रपट ‘मिनाले’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. ‘मिनाले’ मध्येही माधवन् होता आणि त्याच्या हिंदी रिमेकमध्येही तोच दिसला. या चित्रपटात दीया मिर्झा त्याच्या अपोझिट दिसली होती. यातील गाणी प्रचंड लोकप्रीय झाली होती. 
यानंतर माधवन अनेक हिंदी चित्रपटांत दिसला. ‘रंग दे बसंती’,‘थ्री इडियट्स’,‘तनु वेड्स मनु’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ असे यादगार चित्रपट त्याने दिलेत. आज माधवन् अभिनेता, लेखक आणि निर्माता अशा तिन्ही भूमिकेत बॉलिवूडमध्ये वावरतो.  माधवनच्या  वाढदिवसानिमित्त त्याच्या चित्रपटांची काही लोकप्रीय गाणी आज आम्ही तुम्हाला याठिकाणी ऐकवणार आहोत. ऐका तर...!

​रहना है तेरे दिल में (जरा जरा बहेकता है)



फिल्म: रहना है तेरे दिल में (सच कह रहा है दीवाना)



फिल्म: तनु वेड्स मनु (साडी गली)



फिल्म: रंग दे बसंती (तुम बिन बताए)



फिल्म: 3 इडियट्स (आल इज वेल)

Web Title: birthday special: Today's birthday for your funny 'Madi'; Look, some of his favorite songs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.