Birthday special : सितारा देवीने नाकारला होता पद्मभूषण पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 14:47 IST2017-11-08T09:17:31+5:302017-11-08T14:47:31+5:30
गूगलने आज डूडलवरुन प्रसिद्ध कथ्थक क्वीन सितारा देवी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सितारा देवी या प्रसिद्ध कथ्थक डान्सर होत्या. ...

Birthday special : सितारा देवीने नाकारला होता पद्मभूषण पुरस्कार
ग गलने आज डूडलवरुन प्रसिद्ध कथ्थक क्वीन सितारा देवी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सितारा देवी या प्रसिद्ध कथ्थक डान्सर होत्या. त्यांचा आयुष्याचा प्रवास संघर्षमय आणि रोमांचित करणारा होता. सितारा देवी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1920 साली कोलकत्तामध्ये झाला. सितारा देवी यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी नृत्य सम्रागिनी हा खिताब दिाल होता. त्यावेळी त्या अवघ्या 16 वर्षांच्या होत्या. सितारा देवी यांचे वडील सुखदेव महाराज कथ्थक डान्सर आणि संस्कृतमधले विद्वान होते. सुखदेव यांना नेहमी वाटायचा त्यांचा मुलीने नृत्य शिकले पाहिजे. त्याच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर चारही बाजूंने टीका झाली होती.
सितारा देवी यांनी लहान वयात कथ्थकचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. जळपास वयाच्या 10 व्या वर्षीपासून त्यांनी सोलो परफॉर्मन्स द्यायला सुरुवात केली होती. ज्यावेळी त्यांचे कुटुंब मुंबईत स्थित झाले त्यावेळी त्यांनी आतिया बेगम पॅलेसमध्ये कथ्थक नृत्य सादर केले होते. ज्यावेळी त्याठिकाणी नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर, स्वतंत्रता सेनानी सरोजिनी नायडू हजर होत्या. रवींद्रनाथ टागोर त्यांना परफॉर्मन्स पाहुन थक्क झाले होते. त्यांनी सितारा देवी यांना 50 रुपये भेट म्हणून दिले होते.
सितारा देवी यांनी कला आणि नृत्यातील विशेष योगदानासाठी 1970 साली पद्मश्री आणि 1994 साली कालिदास पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना 1969 साली संगीत नाटत अकादमीच्या पुरस्कारने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते. मात्र 2002मध्ये पद्मभूषण पुरस्कार स्वीकारायला त्यांनी नकार दिला. पीटीआयच्या रिपोर्टनुसार त्यांनी या मागचे कारण सांगितले की त्या भारत रत्न पेक्षा कमी कोणाताही अॅवॉर्ड स्वीकारणार नाही. सितारा देवी यांनी अनेक चित्रपटात सुद्धा नृत्य केले आहे. नगीना, रोटी, वतन आणि अंजली सारख्या चित्रपटात त्यांनी परफॉर्म केले होते. फक्त कथक नृत्यच नव्हे, तर अन्य भारतीय शास्त्रीय नृत्यशैली आणि लोकनृत्यांमध्येही त्या पारंगत होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला, माला सिन्हा, रेखा, काजोल या सारख्या अभिनेत्रींनी सितारा देवी यांनी नृत्याचे धडे दिले होते.