Birthday Special : ​म्हणून अक्षय खन्नाने अद्याप केले नाही लग्न...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 10:30 IST2017-03-28T05:00:42+5:302017-03-28T10:30:42+5:30

अभिनेता अक्षय खन्ना याचा आज(२८ मार्च) वाढदिवस. ७०-८० च्या दशकातील लोकप्रीय अभिनेते विनोद खन्ना याचा मुलगा अशी ओळख घेऊन ...

Birthday Special: So Akshay Khanna has not done yet ...! | Birthday Special : ​म्हणून अक्षय खन्नाने अद्याप केले नाही लग्न...!

Birthday Special : ​म्हणून अक्षय खन्नाने अद्याप केले नाही लग्न...!

िनेता अक्षय खन्ना याचा आज(२८ मार्च) वाढदिवस. ७०-८० च्या दशकातील लोकप्रीय अभिनेते विनोद खन्ना याचा मुलगा अशी ओळख घेऊन अक्षय खन्ना बॉलिवूडमध्ये आला. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये अक्षयने अनेक चित्रपटांत काम केले. यापैकी काही चित्रपट आपटले तर काही हिटही झालेत. पण अक्षयचे करिअर म्हणावे तसे बहरले नाही. यानंतर अक्षय अचानक बॉलिवूडमधून दिसेनासा झाला. पाच वर्षांच्या दीर्घ ब्रेकनंतर अक्षय अलीकडे ‘ढिशूम’ या चित्रपटातून पुन्हा परतला. जाणून घेऊ या अक्षयबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी....



अक्षयने मुंबईत शिक्षण पूर्ण केले. पित्याचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचा अक्षयचा इरादा पक्का होता. मग त्याने अभिनयाचे शिक्षण घेतले. नमित कपूर अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनयातील बारकावे आत्मसात केले. यानंतर ‘हिमालयपुत्र’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले. हा चित्रपट अक्षयचे वडिल विनोद खन्ना यांनी प्रोड्यूस केला होता. अर्थात हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवून देऊ शकला नाही. पण यातील अक्षयच्या अभिनयाचे मात्र कौतुकच झाले.



अक्षयने चाळीशी ओलांडलीय. पण अद्याप त्याने लग्न केलेले नाही. सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये अक्षयने एक खुलासा केला होता. मला माझ्यापेक्षा २७ वर्षांने मोठ्या जयललितांशी डेट करण्याची इच्छा होती, असे तो म्हणाला होता. जयललितांमध्ये असे खूप काही आहे, ज्यामुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झालोय, असे तो म्हणाला होता. अक्षयचा विवाह संस्थेवर विश्वास नाही. यापेक्षा तो लिव्ह इनवर विश्वास ठेवता. त्याच्यामते, लिव्ह इनमध्ये एकत्र राहण्यासाठी कुठल्याही कागदपत्राची गरज नसते.

ALSO READ : अक्षय पुन्हा एकदा दिसणार खलनायकाच्या भूमिकेत !



अक्षयने लग्न केलेले नाही. पण त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जुळले. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या अनेक गर्लफे्रन्डला अक्षयने डेट केले आहे. पूजा बत्रा, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, टिष्ट्वंकल खन्ना आदींसोबत अक्षय खन्नाचे नाव जुळले. ऐश्वर्या रायसोबत त्याच्या डेटिंगच्या बातम्याही आल्या होत्या. अर्थात अक्षयने यावर बोलणे टाळले.


 
‘हिमालयपुत्र’नंतर अक्षय मल्टिस्टारर ‘बॉर्डर’मध्ये दिसला. यातील अक्षयच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते. यानंतर अनेक चित्रपटात अक्षयने आपल्या अभिनयाचे दर्शन घडवले.



१९९९ मध्ये ‘आ लौट चले’ आणि ‘ताल’ हे अक्षयचे हिट सिनेमे. या दोन्ही चित्रपटात अक्षयच्या अपोझिट दिसली ती ऐश्वर्या राय. यानंतर अक्षय फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता है’मध्ये दिसला. हा चित्रपटही लोकप्रीय ठरला. अक्षयने केवळ हिरोच नाही तर पडद्यावर खलनायकही साकारला. ‘हमराज’ या चित्रपटात अक्षय नकारात्मक भूमिकेत दिसला. त्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती.



यानंतर तो कॉमेडी करतानाही दिसला.  ‘हंगामा’ या चित्रपटात तो विनोदी भूमिकेत दिसला. निगेटीव्ह रोलपासून तर कॉमेडीपर्यंतच्या सगळ्या भूमिका अक्षयने साकारल्या. केवळ एवढेच नाही तर ‘गांधी: माय फादर’ यात मोहनदास गांधी यांचा चौथा मुलगा हिरलाल गांधीची व्यक्तिरेखा साकारून तो गंभीर भूमिकाही साकारू शकतो, हे सिद्ध करून दाखवले.



अक्षयने आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्याकाळच्या टॉप अ‍ॅक्ट्रेससोबत काम केले. मग ती ऐश्वर्या राय असो, माधुरी दीक्षित असो वा करिना कपूर. ‘ताल’मध्ये तो ऐश्वर्यासोबत दिसला. ‘मोहब्बत’मध्ये त्याची हिरोईन होती माधुरी. तर ‘हलचल’मध्ये करिना कपूर त्याच्या अपोझिट दिसली.

Web Title: Birthday Special: So Akshay Khanna has not done yet ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.