बालकलाकार म्हणून केली सुरुवात, अन् मग इंडस्ट्रीतून अचानक गायब झाला शाहरुखचा ऑनस्क्रिन भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:03 PM2023-07-05T12:03:29+5:302023-07-05T12:06:01+5:30

वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत, संजय खान यांचा मुलगा जायेद खान याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. पण दुर्दैवाने जायेदला वडिलांसारखे स्टारडम मिळवता आले नाही.

Birthday special shah rukh khan on screen brother zayed khan career films serials production house family love life unknown facts | बालकलाकार म्हणून केली सुरुवात, अन् मग इंडस्ट्रीतून अचानक गायब झाला शाहरुखचा ऑनस्क्रिन भाऊ

बालकलाकार म्हणून केली सुरुवात, अन् मग इंडस्ट्रीतून अचानक गायब झाला शाहरुखचा ऑनस्क्रिन भाऊ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता जायेद खानचा आज वाढदिवस आहे. 5 जुलै 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या जायेद आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. संजय खान एकेकाळचा लोकप्रिय अभिनेते. त्यांनी आपला काळ गाजवला. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत, संजय खान यांचा मुलगा जायेद खान याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. पण दुर्दैवाने जायेदला वडिलांसारखे स्टारडम मिळवता आले नाही. 

सिमोन, सुजैन (हृतिक रोशनची एक्स वाईफ), फराह या तीन बहिणींच्या पाठी जन्मलेल्या जायेदचे बालपण अतिशय लाडाकौतुकात गेले. घरात शेंडेफळ असल्याने त्याचे अमाप लाड झाले. डेहराडूनच्या वेल्हम ब्वॉईज स्कूल आणि तामिळनाडूच्या कोडाईकणाल इंटरनॅशल स्कूलमधून जायदने शिक्षण पूर्ण केले.

जायेदची पत्नी मलायका पारेखही याच स्कूलमध्ये शिकलीय. पुढील शिक्षणासाठी जायेद लंडनमध्ये गेला. येथील लंडन फिल्म अ‍ॅकेडमीत त्याने फिल्म मेकिंगचा कोर्सही केला. 

2005 मध्ये जायेदने मलायका पारेखसोबत लग्न केले. एका मुलाखतीत जायेदने त्याच्या प्रेमकथेबद्दल सांगितले होते. मी मलायकाला तीनदा प्रपोज केले होते. प्रत्येकवेळी मी तिला नवी रिंग दिली. या तिन्ही रिंग आजही तिच्याजवळ आहेत. सध्या जायेद व मलायका यांना जिदान व आरिज नावाची दोन मुले आहेत.

2003 मध्ये जायेदने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याचा निर्णय दिला. दिग्दर्शक संगीत सिवान यांच्या ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटातून त्याचा डेब्यू झाला. जायेदची बालपणीची मैत्रिण ईशा देओल ही त्याची या चित्रपटात हिरोईन होती. यानंतर  ‘शादी नंबर वन’, ‘दस’,‘फाईट क्लब’, ‘मिशन इस्तांबुल’ अशा अनेक चित्रपटात त्याची वर्णी लागली. सलमान खान सोबत ‘युवराज’ या चित्रपटातही तो झळकला. पण सलमानही जावेदची नौका तारू शकला नाही. २००४ मध्ये तो शाहरूख खानसोबत ‘मैं हू ना’मध्ये झळकला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर अर्जुन रामपाल आणि अमीषा पटेल यांच्यासोबत तो ‘वादा’मध्ये दिसला. 

जायेद खान दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. ‘मैं हू ना’ आणि ‘शब्द’ सारख्या चित्रपटात जायेद खान दिसला. नंतर अचानक दिसेनासा झाला. मोठ्या पडद्यावर यश मिळत नाही, म्हटल्यावर छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय जायेदने घेतला. अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला मैं हूँ ना हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात अभिनेता जायेद खान याने शाहरुखच्या सावत्र भावाची लक्ष्मणची भूमिका साकारली होती. परंतु, या चित्रपटानंतर तो फार मोजक्या चित्रपटांमध्ये झळकला. काही दिवसांपूर्वी त्यांनी 'हंगेरी वुल्फ एंटरटेनमेंट' नावाने स्वतःची कंपनी सुरू केली.

Web Title: Birthday special shah rukh khan on screen brother zayed khan career films serials production house family love life unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.