Birthday Special : ​सोनाक्षी सिन्हाबद्दल जाणून घ्या, काही माहित नसलेल्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 12:14 IST2017-06-02T06:44:09+5:302017-06-02T12:14:09+5:30

बॉलिवूडची ‘दबंग’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा आज (२ जून) वाढदिवस. २ जून १९८७ रोजी बिहारची राजधानी पटणा येथे सोनाक्षीचा ...

Birthday Special: Learn about Sonakshi Sinha, things you do not know! | Birthday Special : ​सोनाक्षी सिन्हाबद्दल जाणून घ्या, काही माहित नसलेल्या गोष्टी!

Birthday Special : ​सोनाक्षी सिन्हाबद्दल जाणून घ्या, काही माहित नसलेल्या गोष्टी!

लिवूडची ‘दबंग’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा आज (२ जून) वाढदिवस. २ जून १९८७ रोजी बिहारची राजधानी पटणा येथे सोनाक्षीचा जन्म झाला. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या पोटी जन्मलेल्या सोनाक्षीने फॅशन डिझाईनिंगमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.



कॉस्च्युम डिझाईनर म्हणून केली कारकिर्दीची सुरूवात



सोनाक्षीने अभिनेत्री म्हणून नाही तर कॉस्च्यूम डिझाईनर म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘मेरा दिल लेकर देखो’ या २००५ मध्ये आलेल्या चित्रपटासाठी तिने कॉस्च्युम डिझाईनर म्हणून काम केले. यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये तिने बॉलिवूड डेब्यू केला. सलमान खानच्या अपोझिट ‘दबंग’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. यातील सोनाक्षीच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली आणि मग सोनाक्षीने कधीच मागे वळून पाहिले नाही. चित्रपटात येण्यापूर्वी सोनाक्षीने मॉडेलिंग केली.

सलमानच्या म्हणण्यानुसार कमी केले वजन




एकदा सलमान सोनाक्षीला भेटला तेव्हा सोनाक्षी चांगलीच गोलमटोल होती. सलमानने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. सलमानच्या या सल्लयानंतर सोनाक्षी कामी लागली आणि स्वीमिंग व योग याद्वारे तिने तिचे तब्बल ३० किलो वजन कमी केले. यानंतर ती सलमानची हिरोईन म्हणून बॉलिवूडमध्ये आली. ‘दबंग’साठी मिळालेले पहिले मानधन तिने सलमानच्याच ‘बीर्इंग ह्युमन’ या एनजीओला दान केले होते. 

पेन्टिंग व स्केचची हौस



सोनाक्षीला पेन्टिंग व स्केचिंग या कला मनापासून आवडतात. ‘लुटेरा’ या चित्रपटात ती पेन्टिंग करताना दिसली होती. याशिवाय रॅप करणेही तिला आवडते. तिने अनेक गाण्यांत रॅपिंग केली आहे.

लव्ह लाईफ



सध्या सोना तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. सोहेल खानचा साळा बंटी सचदेव याच्यासोबत सोनाचे नाव जोडले जात आहे. बंटी व सोनाक्षी या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले आहे. मध्यंतरी या दोघांच्या ब्रेकअपचीही बातमी आली होती.

Web Title: Birthday Special: Learn about Sonakshi Sinha, things you do not know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.