लगान, मुन्नाभाई एमबीबीएससारखे सुपरहिट सिनेमे देऊनही का संपले ग्रेसी सिंगचे फिल्मी करिअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:22 AM2020-07-20T10:22:13+5:302020-07-20T10:24:38+5:30

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘लगान’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हिरोईन ग्रेसी सिंग हिने काही मोठ्या सिनेमांत काम केले.  मात्र अचानक मी पडद्यावरून गायब झाली.

birthday special gracy singh carrier after lagaan gangajal and munnabhai mbbs | लगान, मुन्नाभाई एमबीबीएससारखे सुपरहिट सिनेमे देऊनही का संपले ग्रेसी सिंगचे फिल्मी करिअर?

लगान, मुन्नाभाई एमबीबीएससारखे सुपरहिट सिनेमे देऊनही का संपले ग्रेसी सिंगचे फिल्मी करिअर?

googlenewsNext
ठळक मुद्देटीव्हीवर काम करत असतानाच तिने 2009 मध्ये डान्स अ‍ॅकेडमी सुरु केली.

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘लगान’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हिरोईन ग्रेसी सिंग हिने काही मोठ्या सिनेमांत काम केले.  मात्र अचानक मी पडद्यावरून गायब झाली. असे का? तर आज तेच जाणून घेऊ यात.
 ग्रेसी सिंग हिचा आज (20 जुलै) वाढदिवस. 20 जुलै 1980 रोजी दिल्लीत ग्रेसीचा जन्म झाला. ग्रेसीचे वडिल स्वर्ण सिंह एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत आणि आई वरजिंदर कौर शिक्षक होती. ग्रेसीने डॉक्टर वा इंजिनिअर बनावे, अशी तिच्या पालकांची इच्छा होती़ पण ग्रेर्सीला मॉडेलिंगमध्ये रस होता.

तुम्हाला माहित नसेल पण चित्रपटांत येण्याआधी ग्रेसीने काही मालिकांमध्ये काम केले. झी टीव्हीवरील ‘अमानत’मध्ये तिने घरून पळून जाणा-या मुलीची भूमिका साकारली होती.

‘अमानत’मध्ये ग्रेसीची भूमिका म्हणायला फारच छोटी होती. मात्र तिचा दमदार अभिनय सर्वांच्या डोळ्यात भरल्यावाचून राहिला नाही. यामुळे तिला काजोलच्या ‘हम आपके दिल में रहते है’ या सिनेमात संधी मिळाली. यात तिने काजोलच्या बहिणीची भूमिका साकारली.

 2001 मध्ये ग्रेसीला आमिर खानच्या अपोझिट ब्रेक मिळाला. ‘लगान’ या गाजलेल्या चित्रपटात ग्रेसी लीड रोलमध्ये दिसली. या चित्रपटाला आॅस्करच्या विदेशी भाषा श्रेणीत नॉमिनेशन मिळाले होते. ‘लगान’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना चित्रपटात एका भोळ्या-भाबळ्या मुलीचा शोध होता. ग्रेसी या भूमिकेसाठी अगदी योग्य होती.

2003 मध्ये अजय देवगणसोबत ‘गंगाजल’मध्ये तिची वर्णी लागली. पण यात तिची भूमिका फार मोठी नव्हती. याचवर्षी अनिल कपूर आणि प्रीति झिंटासेबत ‘अरमान’ या चित्रपटात ग्रेसीला संधी मिळाली. 2004 मध्ये ग्रेसी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सुपरडुपर हिट चित्रपटातही दिसली.

पण यानंतर ग्रेसीच्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली. यानंतर काही बी आणि सी ग्रेडच्या चित्रपटांत काम करण्याची वेळ तिच्यावर आली. पण इथेही ग्रेसी टीकली नाही. मग तिने पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. ‘जय संतोषी मां’ या मालिकेत ती टायटल रोलमध्ये दिसली.

असे म्हणतात की, ग्रेसी चित्रपटांमध्ये तिच्या कपड्यांबाबत प्रचंड चुजी होती. तिला भडक, उत्तेजित करणारे कपडे अजिबात आवडाचे नाही, यामुळे अनेक दिग्दर्शक निर्मात्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली.

टीव्हीवर काम करत असतानाच तिने 2009 मध्ये डान्स अ‍ॅकेडमी सुरु केली. गेल्या काही वर्षांत ग्रेसी बरीच बदलली आहे. या वर्षांत अध्यात्माकडे तिचा ओढा वाढला. यानंतर ग्लॅमरपासून ती पूर्णपणे दूर गेली आणि तिने ब्रह्मकुमारी ज्वॉईन केली.

Web Title: birthday special gracy singh carrier after lagaan gangajal and munnabhai mbbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.