बर्थडे स्पेशल : बॉलीवूडचा ‘यमला जट’ धर्मेंद्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 12:19 IST2016-12-08T10:14:58+5:302016-12-08T12:19:52+5:30
अशा अष्टपैलू कलाकाराचा आज वाढदिवस. त्याला ‘सीएनएक्स मस्ती’ टीमकडून हार्दिक शुभेच्छा...!!!

बर्थडे स्पेशल : बॉलीवूडचा ‘यमला जट’ धर्मेंद्र
‘< strong>बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना!’ हा ‘शोले’ चित्रपटातला प्रसिद्ध संवाद आठवतोय ना? आपल्या लाडक्या ‘वीरू’चा हा आपण कसा काय विसरू शकतो? कधी विनोदी तर कधी गंभीर अभिनय करून प्रेक्षकांना प्रेमात पडण्यास भाग पाडणाऱ्या धर्मेंद्रच्या भूमिकांनी ८० च्या दशकातली हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली.
त्याचे व्यक्तीमत्त्व, संवाद, देहबोली, हावभाव, आणि रूबाबदारपणामुळे तर बॉलीवूडची ‘ड्रीमगर्ल’ही भाळली. हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्याने दर्जेदार भूमिका तर केल्याच पण एक निर्माता म्हणून त्याने ‘बेताब’, ‘घायल’ यासारखे चित्रपटही तयार केले. सनी आणि बॉबी या दोन्ही मुलांवर अभिनयाचे संस्कार करून बॉलीवूडला गुणी कलाकार मिळवून दिले.
अशा अष्टपैलू कलाकाराचा आज वाढदिवस. त्याला ‘सीएनएक्स मस्ती’ टीमकडून हार्दिक शुभेच्छा...!!!
धरमसिंग टू धर्मेंद्र:
![]()
पंजाबच्या लुधियाना शहरातील ‘नुसराली’ या गावी धरमसिंग देओलचा जन्म झाला. केवल किशनसिंग देओल आणि सत्वंत कौर हे त्यांचे आई-वडील. लुधियानाच्या ‘गव्हर्नमेंट सिनिअर सेकंडरी स्कूल आणि १९५२ मध्ये फगवारा येथील रामग्रहीय कॉलेजमध्ये धर्मेंद्रने शिक्षण घेतले. वयाच्या १८ व्या वर्षीच ‘फिल्मफेअर’चा न्यू टॅलेंट अॅवॉर्ड मिळवला. कामाच्या शोधात मग तो पंजाबहून मुंबईला आला.
अॅक्शन किंग :
धर्मेंद्रने दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांच्या १९६० मधील ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या हिंदी चित्रपटातून डेब्यू केला. यासाठी त्याला केवळ ५१ रूपये देण्यात आले होते. त्यानंतर १९६१ च्या ‘बॉयफ्रेंड’ चित्रपटातून सह-कलाकाराची भूमिका केली. १९६०-६७ दरम्यान त्याने अनेक रोमँटिक भूमिका साकारल्या.
अभिनेत्री नूतनसोबत ‘सूरत और सीरत’,‘बंदिनी’,‘ दिल ने फिर याद किया’,‘दुल्हन एक रात की’ या चित्रपटांमध्ये तर माला सिन्हासोबत ‘अनपड’,‘ पूजा के फुल’,‘बहारें फिर भी आयेगी’ या चित्रपटांत काम केले. नंदा, सायरा बानू, मीना कुमारी, पूर्निमा अशा विविध अभिनेत्रींसोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स करण्याची संधी त्याला मिळाली.
‘फुल और पत्थर’ आणि ‘मेरा गाव मेरा देश’ (१९७१) या दोन चित्रपटांमुळे तो ‘अॅक्शन किंग’ म्हणून नावारूपास आला. १९६६ साली प्रदर्शित ‘फुल और पत्थर’ तर त्यावर्षी बॉक्स आॅफिसवर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.
‘ड्रीमगर्ल’सोबत रोमान्स
![]()
अभिनेत्री हेमा मालिनीसोबत लग्न करण्याअगोदर धर्मेंद्रने प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना सनी, बॉबी, अजीता आणि विजेता अशी दोन मुले व दोन मुली आहेत. यांपैकी अजीता आणिज विजेता चंदेरी दुनियेपासून नेहमीच दूर राहिल्या.
यशाच्या उच्चशिखरावर असताना धर्मेंद्रच्या जीवनात प्रवेश झाला तो बॉलीवूडची ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीचा. ‘सीता और गीता’, ‘नया जमाना’, ‘तुम हसीन मैं जवान’, ‘शोले’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी सोबत काम केले. हेमासोबत चित्रपट करण्याची एकही संधी ते सोडत नसत. यादरम्यान त्यांचे प्रेम जुळले. हेमापासून त्यांना इशा आणि अहाना या दोन मुली आहेत.
डाऊन टू अर्थ स्टार
धर्मेंद्र ८० च्या दशकात करिअरच्या अत्युच्च टोकावर होते. परंतु तरीदेखील मल्टीस्टारर फिल्म आनंदाने स्वीकारायचा. सहकलाकाराची भूमिका स्वीकारण्यात तो कमीपणा मानत नसे. कपूर कुटुंबियांसोबत त्याचे खूप जवळचे संबंध आहेत. हिंदी सोबतच पंजाबी भाषेत ‘कांकन दी ओले’,‘दो शेर’,‘दुख भंजन तेरा नाम’,‘तेरी मेरी इक जिंदडी’,‘पुत्त जतन दे’,‘कुर्बानी जट दी’ या चित्रपटातही त्याने काम केले.
![]()
‘सूरैया’ चा ‘डायहार्ड फॅन’ :
एखादा अभिनेता दुसऱ्या कलाकाराचा फॅन असू शकतो का? तर होय. केवळ फॅनच नाही तर डायहार्ड फॅनही असू शकतो. धर्मेद्र हे अभिनेत्री सूरैयाचे खुप मोठे फॅन आहेत. तरूणपणी त्यांनी सूरैया यांचा ‘दिल्लगी’ चित्रपट पाहण्यासाठी अनेक मैलांचे अंतर कापले होते. तब्बल ४० वेळेला त्याने हा चित्रपट पाहिला. तेव्हाच त्याने ठरवले होते की, आपणही अभिनेता व्हायचे.
काही प्रसिद्ध संवाद :
‘ हम काम सिर्फ पैसों के लिए करते हैं’ - शोले
‘कुत्ते कमिने मैं तेरा खुप पी जाऊंगा’ - अनेक चित्रपटात
‘ओय इलाखा कुत्तों का होता हैं, भेन के टक्के...शेर का नहीं’
‘कफन ओढने वाले घंटे गिनते नहीं, घडियाँ गिनते हैं’ - लोहा
‘कितनी बार कहाँ हैं, ऐश कर, ईश्क मत कर’ - यमला पगला दिवाना
‘एक एक को चुन चुन को मारूंगा, चुन चुन के मारूंगा’ -शोले
‘अॅक्टर क्या हैं, डायरेक्टर के हाथ की कथपुतली’ - चुपके चुपके
‘पहले एक हिंदुस्थानी को समझलो, हिंदी अपने आप समझ जायेगी ’ - अपने
प्रसिद्ध गाणी :
पल पल दिल के पास
मैं जट यमला पगला दिवाना - प्रतिज्ञा
आज मौसम बडा बेइमान हैं - लोफर
मैं कहीं कवी न बनजाऊ - प्यार ही प्यार
अब के सजन सावन मैं -चुपके चुपके