birthday special : ​वडिलांच्या दुस-या लग्नाच्या निर्णयाने सैरभैर झाला होता अर्जुन कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 10:35 IST2017-06-26T05:02:38+5:302017-06-26T10:35:43+5:30

अभिनेता अर्जुन कपूरचा आज (२६ जून) वाढदिवस. अर्जुन प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा आहे. पण आज अर्जुनने स्वबळावर ...

Birthday special: Arjun Kapoor was excited about his second marriage decision! | birthday special : ​वडिलांच्या दुस-या लग्नाच्या निर्णयाने सैरभैर झाला होता अर्जुन कपूर!

birthday special : ​वडिलांच्या दुस-या लग्नाच्या निर्णयाने सैरभैर झाला होता अर्जुन कपूर!

ong>अभिनेता अर्जुन कपूरचा आज (२६ जून) वाढदिवस. अर्जुन प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा आहे. पण आज अर्जुनने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्मा केले आहे. अर्जुनच्या फिल्मी करिअरबद्दल तर तुम्हाला ठाऊक आहेच. आज आम्ही अजुर्नच्या आयुष्यातील काही सीक्रेट तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. अनिल कपूर आणि संजय कपूर अर्जुनचे काका असून सोनम कपूर चुलत बहिण आहे. प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी अर्जुनची सावत्र आई आहे.





अर्जुन आपल्या आईच्या अतिशय जवळचा होता.आईच्या निधनानंतर तिच्या आठवणीत त्याने आपल्या हातावर ‘माँ’चा टॅटू गोंदवला आहे. अर्जुनची एक बहीण आहे, अंशुला. अंशुला अर्जुनचा जीव की प्राण आहे. याऊलट सावत्र बहीणी जान्हवी कपूर व खुशी कपूर यांच्यासोबत अर्जुनने कुठलेही नाते ठेवलेले नाहीय. 

अर्जुन ११ वर्षांचा असताना अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरे लग्न केले होते. अर्जुनवर याचा मोठा परिणाम झाला. इतका की,   आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर मी कधीच लग्न करणार नाही, हे अर्जुनने ठरवून टाकले होते.



अर्जुनने फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वप्रथम ‘कल हो ना हो’ आणि त्यानंतर ‘सलाम-ए-इश्क’ या फिल्म मध्ये दिग्दर्शक निखिल आडवाणींना सहाय्य केले होते. ‘वाँटेड’ आणि ‘नो एन्ट्री’मध्ये त्याने सहनिर्मात्याची भूमिकाही बजावली. 



बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अर्जुनचे वजन १४० किलो होते. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सलमान खानने त्याला मार्गदर्शन केले आणि जीममध्ये कसरतही करून घेतली. वजन कमी करण्यासाठी अर्जुनने ब्लॅक कॉफी पिणे सुरु केले. यामुळे फॅट बर्निंग प्रोसेसचा वेग वाढला. फ्राईड फूड व गोड वर्ज्य केले. व्हाईट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड, गव्हाच्या पोळीऐवजी बाजरीची भाकरी, साधे दही असे रेग्यूलर डाएट घेतले.



 १८ व्या वर्षी अर्जुन पे्रमात पडला. सलमानची बहीण अर्पिता खान हिच्यासोबत तो रिलेशनशिपमध्ये होता. पण दोन वर्षांनी त्यांचे ब्रेकअप झाले. सलमानसोबत आजही अर्जुनचे फार चांगले संबंध आहेत.



आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्ससोबत अर्जुनच्या तीन फिल्म्सचा करार झाला होता. अर्जुनने अभिनेता म्हणून ‘इशकजादे’मधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली . यात त्याच्यासोबत परिणीती चोप्राने काम केले. ‘औरंगजेब’मध्ये सर्वप्रथम अर्जुनने दूहेरी भूमिका केली होती. यानंतर ‘गुंडे’मध्ये रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रासोबत काम केले. अर्जुनने चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित ‘२ स्टेट्स’मध्ये काम केले आहे. शिवाय सोनाक्षी सिन्हासोबत होम प्रोडक्शनच्या ‘तेवर’मध्येही काम केले आहे. लवकरच अर्जुनचा ‘मुबारकां’ हा सिनेमा येतोय.

Web Title: Birthday special: Arjun Kapoor was excited about his second marriage decision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.