Birthday Special: अनुष्का शर्माच्या ‘या’ अदांनी केले चाहत्यांना घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2017 10:31 IST2017-05-01T05:01:35+5:302017-05-01T10:31:35+5:30
अनुष्का शर्मा बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. अनुष्काचा आज (१मे) वाढदिवस. सेवानिवृत्त कर्नल अजय कुमार शर्मा आणि आशिमा शर्मा यांच्या घरी ...
.jpg)
Birthday Special: अनुष्का शर्माच्या ‘या’ अदांनी केले चाहत्यांना घायाळ!
लहानपणी अनुष्काला चॉकलेटचे रॅपर जमा करण्याचा छंद होता. चॉकलेटच्या रॅपरचा हा खजाना अनुष्का जोड्यांच्या रिकाम्या डब्यात लपवून ठेवायची. अनुष्काचा हा छंद तिच्या आईला जराही आवडायचा नाही. यावरून अनुष्काने अनेकदा आईचा राग सहन केलाय.
अनुष्काला अभिनेत्री नाही तर मॉडेल बनायचे होते.अनुष्काच्या आई-वडिलांनी तिच्या या निर्णयाला ठोस पाठींबा दिला.
अनुष्काचा आवडता अभिनेता शाहरूख खान आहे. शाहरूखसोबत डेब्यू करणारी अनुष्का या चित्रपटाच्या शूटवेळी कमालीची नव्हर्स होती.
अनुष्काचा आवडता रंग काळा आहे. तिच्या वार्डरोबमध्ये काळ्या रंगाचे अनेक ड्रेस दिसतील ते त्यामुळेच. स्वत:कडे लोकांचे लक्ष वेधण्याचा अनुष्काचा प्रयत्न असतो. खुद्द अनुष्काने एका मुलाखतीत ही गोष्ट कबुल केली आहे.
अनुष्का गत तीन वर्षांपासून क्रिकेटर विराट कोहली याला डेट करत असल्याची चर्चा आहे. गत तीन वर्षांत दोघेही अनेक इव्हेंटमध्य एकत्र दिसले. अर्थात अद्याप दोघांपैकी कुणीही हे रिलेशनशिप मान्य केलेले नाही.
‘एनएच10’ या चित्रपटाद्वारे अनुष्काने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. अलीकडे तिच्या प्रॉडक्शन हाऊसचा दुसरा सिनेमा ‘फिल्लोरी’ रिलीज झाला होता.
‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणारी अनुष्का आज एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या या यशामागे कठोर परिश्रम आणि चिकाटी आहे. २००८ पासून ते आजपर्यंत अनुष्काच्या स्टाईलमध्ये प्रचंड बदल झालाय. निश्चितपणे हा बदल प्रशंसनीय आहे.
‘रब ने बना दी जोडी’: दी गर्ल नेक्स्ट डोअर
‘रब ने बना दी जोडी’ जोडीमध्ये अनुष्काची ‘गर्ल नेक्स्ट डोर’ भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटात अनुष्काने एका गृहिणीची भूमिका साकारली होती. डान्समध्ये तिला प्रचंड रूची असते. या पहिल्या चित्रपटावेळी अनुष्का कमालीची नर्व्हस होती. पण तरिही हा चित्रपट तिने अतिशय आत्मविश्वासाने पूर्ण केला.
बदमाश कंपनी : हॉट अॅण्ड सेक्सी
पहिल्या चित्रपटानंतर साध्या-सरळ इमेजला बाजूला सारून अनुष्काने हॉट अॅण्ड सेक्सी भूमिका स्विकारली. ‘बदमाश कंपनी’मधील तिचे हे रूप पाहून अनेक जण आश्चर्यचकित झालेत.
पीके : केअरफ्री फेशिओनिस्टा
‘पीके’ हा चित्रपट आमिर खानचा चित्रपट मानल्या जातो. पण या चित्रपटात अनुष्काची भूमिकाही महत्त्वपूर्ण होती. या चित्रपटात अनुष्का पत्रकाराच्या भूमिकेत दिसली. यातील अनुष्काच्या आगळ्या-वेगळ्या लूकने प्रेक्षकांना अवाक केले.
सुल्तान : स्पोर्टी
‘सुल्तान’ या चित्रपटात अनुष्काचा स्पोर्टी लूक प्रेक्षकांना बघायला मिळाला. सलमानच्या अपोझिट अनुष्काही तेवढीच भाव खावून गेली.
ऐ दिल है मुश्किल : इंडिपेंडेंट अॅण्ड एलिगेंट
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात अनुष्काने अलिजेहच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेतील अनुष्काची सहज साधा अभिनय सगळ्यांनाच भावला.