Birthday Special : ना रीना, ना किरण... हे होते आमिर खानचे पहिले प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 08:00 IST2020-03-14T08:00:00+5:302020-03-14T08:00:01+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा आज वाढदिवस...

Birthday Special : ना रीना, ना किरण... हे होते आमिर खानचे पहिले प्रेम
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून मिरवणारा आमिर खान याचा आज वाढदिवस. म्हणायला आमिर वर्षातून एक सिनेमा करतो. पण त्याचा हा एक सिनेमा वर्षभराची कमाई करतो. आमिरच्या प्रोफेशनल लाईफबद्दल आपण सगळेच जाणतो. त्यामुळेच आज आम्ही त्याच्या पर्सनल लाईफबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
आमिरने रीना दत्तावर (पहिली पत्नी) खरे प्रेम केले. मात्र दुर्दैवाने हे नाते संपुष्टात आले. यानंतर आमिरच्या आयुष्यात किरण राव आली. त्याने तिच्यासोबत लग्नही केले.
किरणवर आमिर मनापासून प्रेम करतो. पण रीना व किरण या दोघींआधी आमिरच्या आयुष्यात एक मुलगी होती. तिच्यावर आमिर वेड्यासारखे प्रेम करायचा. होय, सोशल मीडियावर खुद्द आमिरनेच हा खुलासा केला होता.
व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने काही वर्षाआधी आमिरने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने त्याची ही सीक्रेट लव्हस्टोरी सांगितली होती. ही लव्हस्टोरी सुरु झाली त्यावेळी अमिर केवळ 10 वर्षांचा होता. होय, 10 वर्षांचा असताना आमिरला पहिले प्रेम झाले होते. तर ती मुलगी आमिरसोबत त्याच्या टेनिस कोचिंग क्लासमध्ये होती. तिला पाहताच आमिर तिच्या प्रेमात पडला होता. अक्षरश: भान विसरला होता.
त्याने सांगितले होते, ‘ मी टेनिस क्लासला जायचो. त्यावेळी टेनिस कोचिंगमध्ये खूप मोठा ग्रूप होता. आम्ही सगळे १० वर्षांच्या वयोगटातील ४०-५० मुलं- मुली होतो. याच ग्रूपमध्ये एक मुलगी होती. तिला पाहताच मी तिच्यावर भाळलो होतो. तिला पहिल्यांदा पाहिले आणि मी तिच्या प्रेमात वेडा झालो. म्हणजे, दिवसरात्र मी केवळ तिच्या अन् तिच्याबद्दल विचार करायचो. ‘पहला नशा...’ या गाण्यातील ‘उडता ही फिरूं इन हवाओं में कही...’ या ओळीसारखी माझी अवस्था होती. ती १० वर्षांची होती आणि कमालीची सुंदर होती. तिला इम्प्रेस करण्यासाठी मी नाही नाही ते उपद्व्याप केलेत. पण अखेरपर्यंत तिला सांगण्याची हिंमत मात्र झाली नाही. क्लासमध्ये सर्वात आधी पोहोचणारा आणि सर्वात उशीरा निघणारा मी होतो. तिला इम्प्रेस करण्याच्या नादात केवळ आणि केवळ माझा गेम चांगला झाला. बाकी माझ्या मनातले मी तिला कधीच सांगू शकलो नाही. पुढे चार वर्षांत ती तिच्या कुटुंबासोबत निघून गेली. ते ‘सायलेंट लव्ह’ होते. जे कायम अधूरे राहिले. इंटरेस्टिंग म्हणजे, मला दोन-तीनदा असे प्रेम झाले. पण प्रेमात मी फार लकी नव्हतो. पण आता माझ्यासारखा नशीबवान कुणीच नाही.’
So here is my Pehla Nasha! #AamirKaPehlaNashahttps://t.co/5DZDtIQONN
— Aamir Khan (@aamir_khan) February 14, 2018