Birtdday Special : अमृता रावने या अभिनेत्यासोबत किस सीन द्यायला दिला होता नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 12:18 IST2017-06-07T06:48:01+5:302017-06-07T12:18:01+5:30

अमृता राव बॉलिवूडमध्ये आली. पण तिची इमेज ‘गर्ल - नेक्स्ट -डोर’ अशीच बनून राहिली. अमृताचा आज (७ जून) वाढदिवस. ...

Birtdday Special: What type of star was given to Amrita Rao with the actor! | Birtdday Special : अमृता रावने या अभिनेत्यासोबत किस सीन द्यायला दिला होता नकार!

Birtdday Special : अमृता रावने या अभिनेत्यासोबत किस सीन द्यायला दिला होता नकार!

ृता राव बॉलिवूडमध्ये आली. पण तिची इमेज ‘गर्ल - नेक्स्ट -डोर’ अशीच बनून राहिली. अमृताचा आज (७ जून) वाढदिवस. आपल्या करिअरमध्ये ती कुठल्याही विवादात अडकली नाही. पण अशी एक वेळ आली की, करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या ब्रेकअपसाठी अमृता जबाबदार असल्याची चर्चा झाली.



शाहिद व अमृता राव या दोघांचा ‘विवाह’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटादरम्यान शाहिद व अमृता हे दोघे बरेच जवळ आले होते. त्याचवेळी करिना व शाहिद रिलेशनशिपमध्ये होते. अमृताने शाहिदच्या जवळ यावे, हे करिनाला अजिबात आवडते नाही आणि याचमुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले, असे मानले जाते. अमृता व शाहिदच्या ‘लिंकअप’च्या बातम्यांनी शाहिद-करिनाचे नाते संपुष्टात आणले. अर्थात अमृता राव लिंकअपच्या सगळ्या चर्चा नाकारल्या. शाहिद केवळ माझा को-स्टार होता, बाकी काहीही नाही, असे तिने सांगितले होते.



यानंतर अमृता चर्चेत आली, ती एका अभिनेत्यासोबत किस सीन द्यायला नकार दिल्यामुळे. २००७ मध्ये अमृता रावला यशराज फिल्म्सची आॅफर मिळाली. या चित्रपटात तिचा रणबीर कपूरसोबतचा किस सीन होता. मात्र अमृताने रणबीरला किस करण्यास नकार दिला. यानंतर चर्चा फिस्कटली आणि अमृताने हा चित्रपटच नाकारला. आता या बातम्यांमध्ये किती सत्यता आहे, हे ठाऊक नाही. कारण अमृता या बातमीने कमालीची डिस्टर्ब झाली होती. इतकी की, यासाठी खुलासा देण्यासाठी तिला समोर यावे लागले होते.



२०१६ मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. टिष्ट्वटरवर तिने लग्नाची बातमी जाहिर केली. लग्नापूर्वी अमृता व अनमोल ७ वर्षे डेटींग करत होते. अर्थात अमृताने हे सगळे दडवून ठेवले. अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याचदरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली.



अमृताने २००२ मध्ये ‘अब के बरस’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यांनतर ती ‘द लीजेंड आॅफ भगत सिंह’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटाने दिली


Web Title: Birtdday Special: What type of star was given to Amrita Rao with the actor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.