बिपाशाच्या बोटात एन्गेजमेंट रिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 05:09 IST2016-03-06T12:09:59+5:302016-03-06T05:09:59+5:30
बॉलिवूडमध्ये लग्नसराईचा मौसम सुरु असतानाच आपली लाडकी बिप्स अर्थात बिपाशा बसू हिचाही सीक्रेट मॅरेजचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. काही ...

बिपाशाच्या बोटात एन्गेजमेंट रिंग?
ब लिवूडमध्ये लग्नसराईचा मौसम सुरु असतानाच आपली लाडकी बिप्स अर्थात बिपाशा बसू हिचाही सीक्रेट मॅरेजचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, बिपाशा व करणसिंह ग्रोवर यांचा साखरपुडा झाला आहे. याबाबत बिप्सने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. मात्र शनिवारी रात्री ती आणि करण दोघेही मुंबईत एका स्पा पार्लरमध्ये गेले होते. येथून बाहेर पडतानांचे बिप्स व करणचे काही छायाचित्र समोर आले आहेत. यापैकी एका छायाचित्रात बिपाशाच्या बोटात अंगठी दिसते आहे. ही साखरपुड्याची अंगठी असल्याचे म्हटले जात आहे. स्पामधून बाहेर पडताना बिप्स आपला चेहरा आणि हात लपवण्याची धडपड करताना दिसली. तेही छायाचित्रकारांनी नेमके टीपले. तशा बिपाशा आणि करणच्या साखरपुड्याची चर्चा नवी नाही. गत फेबु्रवारीतच हे दोघे मार्चमध्ये साखरपुडा करणार असल्याची चर्चा रंगली होती.