बिपाशा बासूला कंडोमच्या जाहिरातीमुळे नाहीतर या गोष्टीमुळे केले गेले ट्रोल,वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 14:11 IST2017-10-24T08:41:56+5:302017-10-24T14:11:56+5:30

बॉलिवूडची अभिनेत्री आणि सेक्सी हॉट बंगाली बाला बिपाशा बासू सध्या रुपेरी पडद्यावरुन गायब आहे.मात्र तरीही बिप्स चर्चेत आहे.आता एका ...

Bipasha Basu was promoted by the promotion of condoms, otherwise this was done due to troll, read detail | बिपाशा बासूला कंडोमच्या जाहिरातीमुळे नाहीतर या गोष्टीमुळे केले गेले ट्रोल,वाचा सविस्तर

बिपाशा बासूला कंडोमच्या जाहिरातीमुळे नाहीतर या गोष्टीमुळे केले गेले ट्रोल,वाचा सविस्तर

लिवूडची अभिनेत्री आणि सेक्सी हॉट बंगाली बाला बिपाशा बासू सध्या रुपेरी पडद्यावरुन गायब आहे.मात्र तरीही बिप्स चर्चेत आहे.आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.तिनं पती करणसिंह ग्रोव्हरसह एक कंडोमची जाहिरात केली आहे. अत्यंत सेक्सी आणि हॉट अंदाजात ही जाहिरात करण्यात आली आहे. मात्र या जाहिरातीमुळे नाही तर वेगळ्या गोष्टीमुळे रसिकांनी बिप्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या जाहिरातीची माहिती, फोटो बिपाशा कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते. याबाबत कधी बिपाशाचं कौतुक होतं किंवा कधी कंडोमसारख्या जाहिराती केल्यामुळे तिला फॅन्सच्या नाराजीचा सामना करावा लागतो. "बिपाशा तुझं स्वतःचं एक ब्रँड मूल्य आहे. त्यामुळे तू सिनेमा करावा, अशा कंडोमच्या जाहिरातींचा उद्योग करु नये" असं एका फॅननं म्हटलंय. दुसरा एक फॅन म्हणतो आहे की, "आता बिपाशा आणि करण दोघांकडे कोणतेही सिनेमा नाहीत त्यामुळे कंडोमसारख्या हॉट जाहिरातींमध्ये काम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही". बिप्सला मात्र कंडोमची जाहिरात करणं, त्याची माहिती अन् फोटो सोशल मीडियावर शेअर करणं यांत काहीही वावगं वाटत नाही. यामुळे समाजात जागरुकताच पसरते असं सांगत बिप्स आपल्या वागण्याचं समर्थन करत आहे. 

सगळ्यात शॉकिंग म्हणजे करणसिंह ग्रोव्हरने चक्क बिपाशासोबत लग्न करत नव्याने संसार थाटला. दोघेही त्यांच्या करिअरमुळे नाही तर त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. तर जेनिफर विंगेट आपल्या मालिकांच्या शूटिंगमध्ये बिझी असते. मात्र जेनिफर आणि करण जिथे कुठे मीडियासमोर येतात तेव्हा या दोघांना त्यांच्या रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारले जातात. नेहमीच हे दोघेही काहीही कारणं देत ही वेळ निभावूनही नेतात.एका कार्यक्रमात रिलेशनशिपबाबत विचारलेल्या प्रश्नाला जेनिफरने दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा  करण-जेनिफर चर्चेत आले आहेत. करणसोबत लग्न करणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असं जेनिफरनं म्हटलं आहे. जेनिफर आजही तिचं प्रेम विसरु शकलेली नाही. जिथं जावं तिथे करणविषयी विचारल्या जाणा-या प्रश्नांमुळेही करणचा विचार तिच्या डोक्यातून काही जात नाही. गेल्याच वर्षी करणने जेनिफरला घटस्फोट देत बॉलिवूड ब्युटी बिपाशा बासूसह लग्न केले. 

Web Title: Bipasha Basu was promoted by the promotion of condoms, otherwise this was done due to troll, read detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.