शिवाजी महाराजांवर बायोपिक! रितेश देशमुख साकारणार ही भूमिका; अजय देवगणचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 13:12 IST2020-01-07T13:12:05+5:302020-01-07T13:12:44+5:30
अजय देवगणचा 'तानाजी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिवाजी महाराजांवर बायोपिक! रितेश देशमुख साकारणार ही भूमिका; अजय देवगणचा खुलासा
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा आगामी बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत चित्रपट 'तानाजी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अजय देवगणने खुलासा केली की अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांवर बायोपिक बनवत आहे आणि या चित्रपटाच्या कामाला सुरूवात झाली आहे.
नुकतेच एका मुलाखतीत अजय देवगणला विचारण्यात आले की, शिवाजी महाराजांच्या बायोपिकमध्ये त्याला कोणती भूमिका साकारायला आवडेल. या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने जराही वेळ न लावता रितेश देशमुखचं नाव घेतलं. अजय म्हणाला की, मी रितेशचं नाव यासाठी घेतले कारण त्याने आधीपासून शिवाजी महाराजांच्या बायोपिकवर काम करायला सुरूवात केली आहे.
अजयने शिवाजी महाराजांच्या बायोपिकबाबत जास्त खुलासा केला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. निष्ठावान मावळ्यांनी त्यांना भक्कम साथ दिली. याच मावळ्यांपैकी एक म्हणजे सुभेदार तानाजी मालसुरे. मुलाचे लग्न बाजूला ठेवून शिवरायांच्या एका शब्दाखातर युद्धासाठी सज्ज झालेल्या तानाजींच्या रूपात मराठ्यांचा इतिहास या चित्रपटातून उलगडणार आहे.
अजय देवगण या चित्रपटात तानाजींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे.
अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. पुढील वर्षी 10 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.