बिग बेजेटवर लहान सिनेमांची सरशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 07:16 IST2016-01-16T01:13:24+5:302016-02-12T07:16:18+5:30
अनिल कपूरचा लहान भाऊ संजय कपूर हा नुकताच शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटात विलनच्या रोलमध्ये दिसून आला. ...

बिग बेजेटवर लहान सिनेमांची सरशी
अ िल कपूरचा लहान भाऊ संजय कपूर हा नुकताच शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटात विलनच्या रोलमध्ये दिसून आला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आदळला गेला, म्हणून संजय क पूरला कोणीही विचारले नाही. संजय हे समजत होता की, या चित्रपटाबरोबर बॉलिवूडमध्ये आपण जोरदार पुन:प्रवेश करीत आहोत. मात्र या अपयशाला संजय कपूर आपल्या नशिबाला दोष देऊ शकतो.
संजय कपूरच्या करिअरच्या बाबतीत विचार केला तर त्यांचे मोजकेच चित्रपट यशस्वी ठरले आहेत. मात्र त्यांच्या नशिबाचे एक सत्य असे जोडले गेले आहे की बॉक्स ऑफिसवर तो शाहरुख खानच्याही पुढे गेला होता. ही गोष्ट खरच आश्चर्यचकित करणारी असली तरी सत्य आहे. 2001 मध्ये शाहरू ख खान व जुही चावला यांचा 'वन टू का फोर' प्रदर्शित झाला होता. त्यावेळी शाहरूखचे नशीब जोर करत होते. त्यामुळे हा चित्रपटाच्या यशाबद्दल जरा जास्तच अपेक्षा होत्या. या चित्रपटासोबतच अजून एक चित्रपट 'छुपा रुस्तम' हा प्रदर्शित झाला होता.
त्यात संजय कपूर व मनीषा कोईराला प्रमुख भूमिकेत होते. संजय कपूरचे नावामुळे हा चित्रपट चालेल की नाही याबाबत शंका होती. 30 मार्च 2001 ला दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तमाम गैरसमजाला दूर करून शाहरुख खानचा चित्रपट पहिल्याच आठवड्यात कोसळला, तर सर्वांना आश्चर्यात टाकत संजयच्या चित्रपटाने दिल्ली, पंजाब, बिहार आणि उत्तरप्रदेशात मोठा व्यापार केला. बिहारमध्ये तर या चित्रपटाच्या यशाने खूप जूने रेकॉर्ड तोडले. या यशाने लोक आश्चर्यचकित झाले. संजय क पूर स्वत: सुन्न झाले.
तर शाहरुख खानच्या चित्रपटाला मागे टाकण्याच्या गोष्टी मीडियाला सांगून आनंद व्यक्त करत होता.
लहान बजेटच्या चित्रपटाने मोठय़ा बजेटच्या चित्रपटाला असे मागे टाकण्याचा हा पहीला आणि एकच अनुभव नाही. बॉलिवूडच्या इतिहासात असा किस्सा अजून सांगता येईल. राहुल रावल दिग्दर्शित सनी देओलचा 'डकेत' व राजश्री प्रोडक्शनचा 'प्रतिघात' यांचे उदाहरण देता येईल. अजय देवगनसोबत असे दोन वेळा घडले. 'फुल और काटे' विरुद्ध 'लम्हे' व 'जिगर' विरुद्ध 'यलगार' अजय समोर दोन्ही मोठय़ा फिल्मस चालल्या नाहीत. म्हणूनच बॉलिवूडला नशीबाचा खेळ मानला जातो.