रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' संदर्भात समोर आली मोठी बातमी, या महिन्यात जाणार फ्लोअरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 17:23 IST2021-03-27T17:22:58+5:302021-03-27T17:23:36+5:30
बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक दमदार चित्रपट रिलीज होणार आहेत आणि यातील एक दमदार चित्रपट म्हणजे 'अॅनिमल'.

रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' संदर्भात समोर आली मोठी बातमी, या महिन्यात जाणार फ्लोअरवर
बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक दमदार चित्रपट रिलीज होणार आहेत आणि यातील एक दमदार चित्रपट म्हणजे 'अॅनिमल'. या चित्रपटाच्या घोषणेसोबत चाहत्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट देण्यात आले होते. त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती ज्याचे नाव 'अॅनिमल' असणार आहे आणि याचा टीझरदेखील प्रदर्शित केला होता. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. आता या चित्रपटाच्या संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे.
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'अॅनिमल' या वर्षी ऑक्टोबर महिन्यात फ्लोअरवर जाणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले आहे. अद्याप याबद्दल अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र चाहत्यांसाठी ही खूप मोठी बातमी ठरू शकते. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सिंगचे दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी करणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर आणि परिणीती चोप्रादेखील दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत एक नाही तर दोन अभिनेत्री दिसणार असल्याचे समजले होते. परिणीती चोप्रा आणि दुसरी अभिनेत्री तृप्ती डिमरी असणार आहे.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याचा लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान त्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे आणि सध्या तो घरातच क्वारंटाइन आहे.