कार्तिकचा जबरा फॅन! ११०० किमी सायकल चालवत आला मुंबईत, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 10:22 AM2024-02-11T10:22:13+5:302024-02-11T10:24:01+5:30

कार्तिक आर्यनला भेटण्यासाठी त्याचा फॅन ११०० किमी सायकल दामटवत मुंबईत आलाय

Big fan of Karthik! 1100 km | कार्तिकचा जबरा फॅन! ११०० किमी सायकल चालवत आला मुंबईत, व्हिडीओ व्हायरल

कार्तिकचा जबरा फॅन! ११०० किमी सायकल चालवत आला मुंबईत, व्हिडीओ व्हायरल

कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय. कार्तिक हा तरुणींच्या गळ्यातला ताईत.  फार कमी कालावधीत कार्तिकने बॉलिवूडसारख्या झगमगत्या इंडस्ट्रीवर स्वतःची छाप पाडली. कार्तिक आर्यनच्या फॅन्सचे अनेक किस्से बघायला मिळतात. कार्तिकला भेटायला असाच एक फॅन तब्बल ११०० किमी सायकल चालवत मुंबईत त्याला भेटायला आला. त्याचा व्हि़डीओ चांगलाच व्हायरल झालाय. 

विरल भयानी पेजने कार्तिकच्या फॅनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा झाशीचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याने झाशीहून सायकलने तब्बल 1100 किलोमीटरचा प्रवास केलाा. फक्त कार्तिकला भेटण्यासाठी या फॅनने मुंबई गाठली. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या फॅनला तब्बल 9 दिवस लागल्याचं बोललं जात आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


 कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर.. 2023 मध्ये प्रदर्शित कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट सुपरहिट झाला. याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिक कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट याच वर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कार्तिक आगामी हंसल मेहताच्या 'कॅप्टन इंडिया' आणि 'भूल भुलैया 3'चाही समावेश आहे.

Web Title: Big fan of Karthik! 1100 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.