Aryan Khan Arrest News: भाऊ आर्यनच्या अटकेनंतर शाहरूख खानच्या लेकीने घेतला हा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:03 IST2021-10-07T18:01:22+5:302021-10-07T18:03:36+5:30
Aryan Khan Arrest News:आर्यनला अटक झाल्यानंतर सुहाना खानने एक मोठे पाऊल उचलले आहे.

Aryan Khan Arrest News: भाऊ आर्यनच्या अटकेनंतर शाहरूख खानच्या लेकीने घेतला हा मोठा निर्णय
मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर एनसीबीने केलेल्या छापेमारीत ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आतापर्यंत एकूण १६ जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट सध्या एनसीबीच्या कोठडीमध्ये आहेत. त्यानंतर आता स्टार किड्स पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. शाहरुखची लेक सुहानाच्या इंस्टाग्रामवरही तिला ट्रोल करत असतात. मात्र, आता आर्यनला अटक झाल्यानंतर सुहाना खानने एक मोठे पाऊल उचलले आहे.
सुहाना खान सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. मात्र, आता भावाच्या अटकेनंतर लोक सोशल मीडियावर सुहानाला देखील ट्रोल करू पाहत आहेत. यामुळे सुहाना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये कमेंट सेक्शन बंद केला आहे. जेणेकरून कोणीही तिच्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. तत्पूर्वी तिचे कमेंट सेक्शन ओपन होता. सध्या सुहाना परदेशात राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहे.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने फक्त भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशातही अमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभादेखील दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचेही समजते आहे.