Kartik Aaryan : कार्तिक आर्यन की तो निकल पडी..., ‘भुल भुलैय्या 2’च्या निर्मात्याने गिफ्ट केली इतक्या कोटींची कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 04:49 PM2022-06-24T16:49:19+5:302022-06-24T16:51:38+5:30

Kartik Aaryan : ‘भुल भुलैय्या 2’ला मिळालेल्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अख्खी टीम खूश्श आहे. आता तर कार्तिक दुहेरी आनंद साजरा करतोय. होय, ‘भुल भुलैय्या 2’चे निर्माते भूषण कुमार यांनी कार्तिकला एक लक्झरी कार भेट दिली आहे.

Bhool Bhulaiyaa 2 producer Bhushan Kumar Gifts Kartik Aaryan Indias First Gt Car Mclaren Worth Crores | Kartik Aaryan : कार्तिक आर्यन की तो निकल पडी..., ‘भुल भुलैय्या 2’च्या निर्मात्याने गिफ्ट केली इतक्या कोटींची कार

Kartik Aaryan : कार्तिक आर्यन की तो निकल पडी..., ‘भुल भुलैय्या 2’च्या निर्मात्याने गिफ्ट केली इतक्या कोटींची कार

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकत विक्रम रचला. ‘भुल भुलैय्या 2’पुढे कंगना राणौतचा ‘धाकड’, अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ असे सिनेमेही फिके पडलेत. ‘भुल भुलैय्या 2’ला मिळालेल्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अख्खी टीम खूश्श आहे. कार्तिक आर्यनचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. आता तर कार्तिक दुहेरी आनंद साजरा करतोय. होय, ‘भुल भुलैय्या 2’चे निर्माते भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी कार्तिकला एक लक्झरी कार भेट दिली आहे.

ऑरेंज कलरच्या या स्वँकी McLaren कारसोबतचे आर्यन व  भूषण कुमार यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. कार्तिकला गिफ्ट मिळालेली कार भारतातील पहिली जीटी कार आहे. या कारला लॉन्ग डिस्टंस ड्रायव्हिंग व हाय स्पीडनुसार खास डिझाईन केलं गेलं आहे. या कारची किंमत 3.72 कोटी रूपये असल्याचे कळतंय. जीटी कार असलेला कार्तिक हा बॉलिवूडचा पहिला अभिनेता ठरला आहे.
भूषण कुमार यांनी कार्तिकसोबत पहिल्यांदा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपटही तुफान गाजला होता.

तेव्हापासून आजपर्यंतचा कार्तिक व भूषण कुमार यांचा प्रवास चांगलाच यशस्वी ठरला आहे.
भूषण  कुमार व कार्तिक आर्यनची जोडी आता आणखी एक नवा सिनेमा घेऊन येतेय. या चित्रपटाचं नाव शहजादा आहे. येत्या काळात भूषण  कुमार कार्तिकसोबत आणखी काही प्रोजेक्ट करणार असल्याचीही चर्चा आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होईल, असं मानलं जातंय.

‘भुल भुलैय्या 2’ने कमावले इतके कोटी
‘भुल भुलैय्या 2’ हा सिनेमा ‘भुल भुलैय्या’चा सीक्वल आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 92.05 कोटींचा बिझनेस केला. दुसºया आठवड्यात 49.70 कोटी, तिसºया आठवड्यात 21.40 कोटी, चौथ्या आठवड्यात 12.99 कोटी आणि पाचव्या आठवड्यात 8.18 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचा बजेट फक्त 80 कोटी होता आणि आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 184.32 कोटींची कमाई केली आहे.

Web Title: Bhool Bhulaiyaa 2 producer Bhushan Kumar Gifts Kartik Aaryan Indias First Gt Car Mclaren Worth Crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.